Ujani dam : ३६ तासांचा शोधमोहिमेनंतर बुडालेल्या पाच जणांचे मृतहेद सापडले; एक अद्याप बेपत्ता

Ujani Dam Boat Accident : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी प्रवासी बोट बुडाली होती. यात ६ जण बेपत्ता झाले होते. यांचा मागील ३६ तासापासून एनडीआरएफच्या पथकाकडून शोध घेतला जात होता.
Ujani Dam Boat sank
Ujani Dam Boat sankAgrowon

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील झरे आणि कुगाव गावावर गेल्या दोन दिवसापासून शोक कळा पसरली होती. झरे गावातील चार आणि कुगाव गावातील दोन अशा सहा जण उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी येथील भीमा नदीत बोट उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत बेपत्ता झाले होते. यात एका वर्षाच्या बालकाचा देखील समावेश होता. यानंतर येथे तब्बल मागील ३६ तासापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून शोध घेतला जात होता. यादरम्यान गुरूवारी (ता. २३) एनडीआरएफच्या पथकाला ६ पैकी पाच जणांचे मृतहेद मिळाले आहेत. मात्र अद्याप एकाचा शोध लागलेला नाही. सध्या पथकाकडून एकाचा शोध घेतला जात आहे.

उजनी धरणात मंगळवारी वादळी वाऱ्याच्या तडाख्याने प्रवासी बोट उलटली. यात ६ जण बेपत्ता झाले होते. यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. यामध्ये कृष्णा दत्तू जाधव (व-२८), कोमल कृष्णा जाधव (व-२५), वैभवी कृष्णा जाधव (व-२.५), समर्थ कृष्णा जाधव (व- १) यांच्यासह एकाचा मृतदेह हाती लागला आहे.

Ujani Dam Boat sank
Ujani Dam Boat sank : वादळी वाऱ्याचा तडाखा! भीमा नदी पात्रात उलटली बोट; ६ बेपत्ता, एनडीआरएफचे पथकाकडून शोध सुरू

एनडीआरएफच्या पथकाने हे सर्व मृतदेह बाहेर काढले असून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पोस्ट मार्टमसाठी पाठवले जाणार आहेत. तर सध्या एकाचा शोध एनडीआरएफच्या पथकाकडून घेतला जात असून शोध मोहिम आणखीन तीव्र करण्यात आली आहे.

Ujani Dam Boat sank
Ujani Dam Boat Accident : उजनी धरणातील बोट दुर्घटनेत आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाल्याची भीती

कशी घडली घटना?

मंगळवारी संध्याकाळी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी येथील भीमा नदीत प्रवासी बोट उलटली होती. यातून जाधव कुटूंबीय नातेवाईकाकडे जागरण गोंधळाला जात होते. यावेळी वादळी वाऱ्याच्या झोतात ही बोट उलटली. ज्यात जाधव कुटूबियांसह इतर दोघे बुडाले. यावेळी पोलीस असणाऱ्या डोंगरे पाण्यात उडी घेऊन पोहत किनारा गाठला आणि याची माहिती गावात दिली. यानंतरच ही घटना समोर आली. याची माहिती तात्काळ प्रशासन, पोलीसांना देण्यात आली. यानंतर येथे शोध कार्य सुरू झाले. पण ते मंगळवारी रात्री ९ वाजता थांबवण्यात आले.

यानंतर पुन्हा बुधवारी शोधकार्य सुरू केल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाकला बोट ३५ फूट खोल सापडली. यासह एक मोटारसायकल देखील मिळाली. तसेच काही साहित्य देखील सापडले होते. मात्र बेपत्ता असणाऱ्या ६ जणांचा शोध लागला नव्हता. यादरम्यान गुरूवारी ६ पैकी पाच जणांचे मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले असून एकाचा शोध घेतला जात आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com