Ujani Dam Boat Accident : उजनी धरणातील बोट दुर्घटनेत आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाल्याची भीती

Ujani Dam Backwater Boat Accident : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बोट दुर्घटनेत आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Ujani Dam Boat Accident
Ujani Dam Boat AccidentAgrowon

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी बोट बुडाल्याची भीषण दुर्घटना घडली. यात ६ जण बेपत्ता झाले असून ही बोट वादळी वाऱ्यामुळे उलटल्याचे समोर आले आहे. सध्या एनडीआरएफच्या पथकाला ३५ फूट खोल पाण्यात बोट सापडली असून यासह एक मोटार सायकल देखील मिळाली आहे. सध्या हे काढून किनाऱ्यावर नेण्याचे काम सुरू आहे. तर यादरम्यआन बेपत्ता झालेल्या सहा जणांमध्ये आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरेंचा मुलगा बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या स्थानिक प्रशासनासह पोलिस आणि एसडीआरएफ घटनास्थळी असून एनडीआरएफचे पथक १७ तासांनंतरही बेपत्ता ६ जणांचा शोध घेत आहेत.

माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा

मंगळवारी (ता.२१) संध्याकाळी भीमा नदीत प्रवासी बोट वादळी वाऱ्यामुळे उलटली. यामुळे येथे ६ प्रवासी बुडाले. यांचा एनडीआरएफ पथकाकडून शोध घेतला जात आहे. मात्र शोध कार्याच्या १७ तासांमध्ये इंदापुरातील भीमा नदीच्या पात्रात बुडालेली बोट सापडली. यादरम्यान यात करमाळा आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे (वय १६) देखील बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. कारण बेपत्ता झालेल्या ६ जाणांमध्ये त्याचेही नाव आहे. पण अद्याप कोणाचा शोध लागलेला नाही. मात्र पोलीस अधिकारी डोंगरे यांनी पाण्यात उडी घेतल्याने ते वाचले. यानंतर त्यांनीच याची माहिती कळाशी गावात येऊन दिल्याने ती उघड झाली.

Ujani Dam Boat Accident
Ujani Dam Boat sank : वादळी वाऱ्याचा तडाखा! भीमा नदी पात्रात उलटली बोट; ६ बेपत्ता, एनडीआरएफचे पथकाकडून शोध सुरू

खासदार निंबाळकर

दरम्यान, बोट दुर्घटनेची माहिती मिळताच खासदार रणजितसिंह निंबाळकर दुर्घटनास्थळी सकाळीच गेले. येथे त्यांनी एनडीआरएफ पथकाकडून शोध मोहमीबद्दल माहिती घेतली. तसेच पथकाबरोबर प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांना, बुडालेल्या प्रवाशांचे साहित्य सापडले असून पथकाला बुडालेली बोट देखील मिळालेली आहे. जी ३५ फूट खोल खडकात अडकली आहे. ती बाहेर काढण्यासाठी पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच जे बेपत्ता आहेत त्यांचाही शोध घेतला जात आहे.

Ujani Dam Boat Accident
Ujani Dam : सोलापूरसाठी ‘उजनी’तून भीमा नदीत पाणी सोडले

सुळे दुर्घटनास्थळी

निंबाळकर दुर्घटनास्थळावर येऊन गेल्यानंतर आता येथे अनेक नेते जाऊन येत आहेत. यादरम्यान इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे देखील घटनास्थळी जाऊन मदतकार्यात सहभाग घेतला. आमदार भरणे यांच्यानंतर येथे शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भेट दिली. त्यांनी देखील बचाव कार्याचा एनडीआरएफ पथकाकडून आढावा घेत शोक व्यक्त केला. सुळे यांनी, कळाशी, ता. इंदापूर येथे पाणलोट क्षेत्रात काल सायंकाळी एक बोट उलटली. तेथे भेट देऊन मदत आणि बचावकार्याची पाहणी केली. एनडीआरएफचे पथक येथे कार्यरत असून या घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ते सुखरूप असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना असे सुळे यांनी म्हटले आहे.

बुडालेल्यांची नावे समोर पुढील प्रमाणे

या दुर्घटनेत करमाळ्याचेच सहा जण बुडाले असून यापैकी चार जण हे झरे या गावचे आहेत. यामध्ये कृष्णा दत्तू जाधव (व-२८), कोमल कृष्णा जाधव (व-२५), वैभवी कृष्णा जाधव (व-२.५), समर्थ कृष्णा जाधव (व- १) यांचा समावेश आहे. याचबरोबर कुगाव गावातील १६ वर्षीय गौरव धनंजय डोंगरे आणि अनिकेत ज्ञानदेव अवघडे (व-२१) यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com