Amit Shah at NDDB : दुग्ध उत्पादकांसाठी अमित शहा यांची मोठी घोषणा; दोन लाख नवीन कृषी पतसंस्था स्थापन करणार

NDDB Diamond Jubilee Celebration : नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या हिरक महोत्सवी समारंभात अमित शहा यांनी, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी दूध उत्पादकास सहकारी दुग्ध संस्थांशी जोडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे म्हटले आहे.
Amit Shah at NDDB
Amit Shah at NDDBAgrowon
Published on
Updated on

Pune News : दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना सहकारी दुग्ध संस्थांशी जोडण्यासाठी नव्या दोन लाख प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन केल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. ते नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या हिरक महोत्सवी समारंभात मंगळवारी (ता.२२) बोलत होते. गुजरातमधील आणंद येथे एनडीडीबीचा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन उर्फ ​​लल्लन सिंह देखील उपस्थित होते.

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येकाला सहकारी दुग्ध संस्थांशी जोडण्याचा करत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी दुधाची पूर्ण रक्कम मिळाली पाहिजे. तर सहकारी संस्थांची रचना मजबूत करण्यासाठी सरकार दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) स्थापन करेल असा दावाही यावेळी शाह यांनी केला.

Amit Shah at NDDB
Amit Shah : सहकार मंत्री अमित शाह आज कोल्हापुरात, राजकीय घडामोडींना वेग

यावेळी शाह म्हणाले की, देशभरातील ८ कोटी कुटुंबे दुग्ध व्यवसायात असून केवळ १.५ कोटी कुटुंबे सहकारी दुग्ध संस्थांशी जोडले गेले आहेत. या कुटुंबांच्या दुधाला योग्य दर मिळत आहे. पण उर्वरित ६.५ कोटी कुटुंब ही योग्य दरापासून वंचित आहेत. दूध उत्पादनात आपला देश पहिल्या क्रमांकावर असून अमेरिकेसारखा देश मागे आज मागे पडला आहे. जगात दूध उत्पादन दोन टक्क्यांनी वाढत असताना भारतात दूध उत्पादनात सहा टक्क्यांनी वाढत आहे. आम्ही गेल्या वर्षी २३ कोटी टन दुधाचे उत्पादन केले, जे जगातील एकूण दूध उत्पादनाच्या २४ टक्के असल्याचे शाह म्हणाले.

या समारंभात एनडीडीबीबद्दल बोलताना शाह म्हणाले की, एनडीडीबीने ग्रामीण भागाच्या तसेच देशाच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे. एवढेच नव्हे तर लोकांना शेतीत स्वावलंबी बनविण्याचे कामही सातत्याने केले आहे. त्रिभुवन पटेल यांनी एनडीडीबीची पायाभरणी केली. जो आज एक वटवृक्ष संस्था बनली असून देशासह जगात एक मोठी संस्था बनली आहे. एनडीडीबी १९८७ मध्ये सुरू झाली आणि १९७० ते १९९६ पर्यंत योग्य नियोजन आणि अंमलबजावणीवर काम केले.

Amit Shah at NDDB
NDDB Dairy Services Kolhapur : परराज्यातील म्हशी मिळणार कोल्हापुरात, 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसचा पुढाकार

लाल बहादूर शास्त्री यांनी १९६४ मध्ये जेव्हा एनडीडीबीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कोणालाच माहीत नव्हते की एक दिवस हे बीज एवढ्या मोठ्या वटवृक्षात रूपांतरीत होईल. आज एनडीडीबीच्या दुधाची विक्री दररोज ४२७ लाख लिटर आहे. तर ३४४ कोटीवरून ४२६ कोटींवर एनडीडीबीचा महसूल पोहचला आहे. तर एनडीडीबीचा निव्वळ नफा ५० कोटींचा असल्याची माहिती शाह यांनी दिली.

दरम्यान एनडीडीबीने भाजीपाला प्रक्रिया केंद्र सुरू केली असून यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला जगभर जाईल. याचे मॉडेल सरकार तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. गोवर्धन योजनेच्या माध्यमातून आपल्या जमिनीचे संवर्धन व सुधारणा झाली असून उत्पादनात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची समृद्धी वाढत असून आता शेणापासून गॅस आणि खत बनवले जात आहे, असे शाह यांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com