Fertilizer : निसर्ग क्रॉप केअरची युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित खते

Fertilizer Imp[ort : एका दशकापूर्वी भारतात युरोपमधून सूक्ष्म अन्नद्रव्य खते व विद्राव्य खते आयात केली जात होती. त्यामुळे त्यांची उपलब्धता कमी राहून खूपच महाग पडत.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Sangli News : एका दशकापूर्वी भारतात युरोपमधून सूक्ष्म अन्नद्रव्य खते व विद्राव्य खते आयात केली जात होती. त्यामुळे त्यांची उपलब्धता कमी राहून खूपच महाग पडत. हे लक्षात घेऊन निसर्ग क्रॉप केअर (इंडिया) प्रा. लिया कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाला भारतीय संशोधनाची जोड देत ‘मायक्रो ग्रॅन्युलर’ स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये व काही निवडक विद्राव्य खतांची निर्मिती केली आहे. ही सर्व खते बाजारपेठेत किफायतशीर दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत.

कंपनीचे संचालक सुभाष पिसाळ व चंद्रकांत खरमाटे म्हणाले, की उत्कृष्ट कच्च्या मालापासून तयार केलेली ही खते मायक्रो ग्रॅन्युलर स्वरूपात असल्याने त्यातील घटक पिकांना उपलब्ध होतात.

Fertilizer
Bogus Fertilizer : बोगस निविष्ठाप्रकरणी फौजदारी कारवाई करा

या खतांची विद्राव्यता चांगली आहे. कंपनीची आजपर्यंत विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खते, पीक संजीवके या श्रेणीतील ३० उत्पादने बाजारात आणलेली आहेत.

Fertilizer
Fertilizers Market : अमरावती जिल्ह्यात अनुदानित खतांचा काळाबाजार

यामध्ये विशेषतः एक्सलन्स कॉम्बी, पोटोचील. के, सिक्वेन्स चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मॅंगेनिज, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, चिलेटेड कॅल्शिअमसह मॅग्नेशिअम व बोरॉनयुक्त खते या सोबतच विद्राव्य खतांमध्ये पोटॅशिअम व मॅग्नेशिअम ऑक्साइडवर आधारित पोटोशाईन के. एम. एस., अॅक्टिव सॉल्ट ऑफ फॉस्फरस यांसह विविध ग्रेड्‌स तयार केल्या.

पिकांच्या सर्वांगीण पोषणासाठी युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित मायक्रो ग्रॅन्युअर स्वरूपातील उत्पादनांना शेतकऱ्यांची पसंती आहे. मायक्रो ग्रॅन्युअर स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खते बनवणारे भारतातील पहिले युनिट आमच्या कंपनीचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com