Sugarcane FRP : नॅचरल शुगर पहिली उचल २७०० रुपये देणार ः बी. बी. ठोंबरे

Sugarcane Season : सद्यःस्थितीत साखरेला बाजारात मागणी आणि उठाव असल्यामुळे नॅचरल शुगरने चालू गळीत हंगामामध्ये उसाला २७०० रुपये प्रति मे.टन याप्रमाणे पहिली उचल देण्याचे घोषित केले आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि., रांजणी या कारखान्याचा २३ वा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला असून, कारखान्याने सरासरी दररोज सात हजार मे. टन याप्रमाणे मराठवाड्यात सर्वाधीक ऊस गाळप करणार असल्याचे नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.

नॅचरल शगरने चालू गळीत हंगामा मध्ये एकूण सात लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले असून त्याप्रमाणे ऊस तोडणी व वाहतुकीचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार आतापर्यंत अत्यंत समाधानकारक गाळप होत असून उद्दिष्टपूर्ततेकडे जोमाने वाटचाल चालू आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : ऊसदराबाबतची शिरोळमधील बैठक निष्फळ

सद्यःस्थितीत साखरेला बाजारात मागणी आणि उठाव असल्यामुळे नॅचरल शुगरने चालू गळीत हंगामामध्ये उसाला २७०० रुपये प्रति मे.टन याप्रमाणे पहिली उचल देण्याचे घोषित केले आहे. नॅचरल शुगरकडे ऊस गाळपास आल्यानंतर प्रत्येक पंधरवाड्याचे बिल ऊस पुरवठादारांचे बॅंक खात्यावर जमा करणार असल्याचे ही, नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी या वेळी सांगितले.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : उर्वरित कारखान्यांच्या उसाच्या पहिल्या उचलीकडे लक्ष

नॅचरल शुगरला प्रतिदिवस ७००० मे.टन उसाचा पुरवठा होत असून त्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण तोडणी वाहतूक यंत्रणेची व्यवस्था यापूर्वीच कारखान्याने केलेली आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी उसाचा पुरवठा करावा, जेणे करून उद्दिष्टांनुसार चालू गळीत हंगामात उसाचे गाळप करून उसाला जादा दर देणे शक्य होईल.

तसेच नॅचरल शुगरच्या विविध उपक्रमांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नामधून सुद्धा उसाला जास्तीत जास्त दर देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यास सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन बी. बी. ठोंबरे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com