Hingoli News : तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक व कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे मंगळवारी (३० जानेवारी) व बुधवारी (३१ जानेवारी) डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधुरी काटकर, कृषिविद्या विषयविशेषज्ञ राजेश भालेराव, गृहविज्ञान विषय विशेषज्ञ रोहिणी शिंदे, कृषिविस्तार विषय विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई, पीक संरक्षक विषय विशेषज्ञ अजयकुमार सुगावे, उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, मृदाशास्त्र विशेषज्ञ साईनाथ खरात, पशुविज्ञान कार्यक्रम समन्वयक डॉ. कैलास गीते, विजय ठाकरे आदी उपस्थित होते.
डॉ. शेळके म्हणाले, की नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीमध्ये योग्य नियोजन करून विविध पीक पद्धतीचा अवलंब करावा. डॉ. काटकर म्हणाल्या, की नैसर्गिक शेतीमध्ये हवामान बदल व पाण्याचे योग्य नियोजन करावे. भालेराव यांनी जिवामृत, गांडूळ पाणी, तयार करण्याची पद्धत व वापर व्हर्मी कंपोस्ट, नाडेप यावर तर सुगावे यांनी निमास्त्र, नीमपर्ण अर्क, निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत वापरण्याची पद्धत समजावून सांगितली.
ओळंबे यांनी लसूण, मिरची, अद्रक अर्क बनवणे व वापर, तर डॉ. मुराई यांनी बीजामृत तयार करण्याची पद्धत व वापर यावर माहिती दिली. खरात यांनी घन जिवामृत बनवण्याची पद्धत वापरण्याची पद्धत सांगितली. डॉ. गिते यांनी अमृतपाणी अमृत पाणी तयार करण्याची पद्धत व त्याचे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाचे महत्त्व यावर माहिती दिली.
हर्षल जैन नैसर्गिक व सेंद्रिय शेती प्रमाणीकरणावर माहिती दिली. या प्रशिक्षणात कळमनुरी तालुक्यातील एकूण ४० शेतकरी गट प्रमुख सहभागी झाले होते. त्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. शिवलिंग लिंगे, मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, मारुती कदम, संतोष हनवते, प्रेमदास जाधव यांचे सहकार्य मिळाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.