Mix Cropping : शेती झाली पीक प्रात्यक्षिक केंद्र

Agrowon Diwali Ank : खरिपामध्ये भात आणि रब्बीमध्ये भुईमूग, गहू लागवड, उन्हाळी हंगामात भेंडी, झेंडू, मिरची आणि काही क्षेत्रावर ऊस लागवड असायची. किफायतशीर उत्पन्न निघायचे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

किरण यादव

माझे गाव संगमनेर (ता. भोर, जि. पुणे). वडिलांची गाव शिवारात प्रयोगशील शेतकरी म्हणून चांगली ओळख होती. त्यामुळे लहानपणापासूनच तीन एकर शेतीमधील वेगवेगळे प्रयोग पाहत मोठा झालो. खरिपामध्ये भात आणि रब्बीमध्ये भुईमूग, गहू लागवड, उन्हाळी हंगामात भेंडी, झेंडू, मिरची आणि काही क्षेत्रावर ऊस लागवड असायची. किफायतशीर उत्पन्न निघायचे. दरम्यानच्या काळात वडील अचानक गेले.

आम्ही तीनही बंधू हॉटेल व्यवसायात असल्याने त्या वेळी थोडे शेतीकडे दुर्लक्ष झाले होते. हे पाहून दोन, चार महिन्यांतच काही गावकऱ्यांनी सुनावले, की तुमचे वडील चांगल्या पद्धतीने शेती करायचे, चांगले उत्पादन घ्यायचे. तुम्ही काय करताय? हे बोल माझ्या मनाला लागले, अन् मी घरच्या शेतीकडे पुन्हा गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली.

२०१० मध्ये मी इलेट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन डिप्लोमा पदवीधर झालो. नोकरीच्या संधी असताना वडील म्हणायचे, की नोकरीपेक्षा धंदा कर, शेतीकडे लक्ष दे. म्हणून माझे बंधू अंकुर आणि सूरज यांच्या साथीने घरचा हॉटेल व्यवसाय पाहायचो, शेतीकडेही लक्ष द्यायचो.

Agriculture
Dairy Farming Success Story : ग्राहकांच्या विश्‍वासाच्या बळावर दुग्धव्यवसायात यश

२०१५ मध्ये वडील अचानक गेल्यानंतर शेतीची जबाबदारी माझ्याकडे आली. शेतीमध्ये हळूहळू बदल करत होतो. दरम्यान मला नीरा देवघर प्रकल्पामध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागली, पण मी शेती सोडली नाही, उलट नव्या पद्धतीने शेतीमध्ये उतरलो.

भोर पट्ट्यात पाऊस चांगला असल्याने खरिपात भाताशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मी देखील पारंपरिक पद्धतीनेच भात शेती करू लागलो. पण पहिल्याच वर्षी लक्षात आले की, शेतीचे अर्थशास्त्र काय जुळत नाही. चिखलणी, पाणी, लावणीसाठी मजुरांचा मेळ जमेना, लागवड ऑगस्टमध्ये होऊ लागली, वेळ आणि पैसा वाया जात होता.

उत्पादनही अपेक्षित येत नव्हते. खर्च वाढत होता. शेतीचे बिघडलेले गणित शिक्षणामुळे लक्षात आले. खोट्या प्रतिष्ठेत शेतकरी म्हणून जगण्यात अर्थ नव्हता. पण भात शेती किफायतशीर कशी करता येईल याचा शोध सुरू केला. चिखलणी न करता भात लागवड शक्य आहे का? पीक बदल शक्य आहे का? यासाठी मी दैनिकातील शेती पुरवणीचे वाचन आणि यू-ट्यूबवरील शेतकऱ्यांच्या मुलाखती पाहू लागलो. त्यातून माहिती घेत विविध पीक लागवडीचे प्रयोग सुरू होते. काही वर्षांपूर्वी संगमनेर- भोर रस्ताकडील आमच्या शेतीमध्ये गादीवाफ्यावर कांदा लागवड केली होती.

Agriculture
Chiku Cultivation Success Story : सहा एकर चिकू बागेतून भरभरून गोडवा

तेथे मी फवारणी करत होतो. तेव्हा एक जण माझ्याकडे आले, त्यांचे नाव योगेश बनसोडे. त्यांनी मला विचारले, की तुम्ही एसआरटी पद्धतीने कांदा लागवड केली आहे का? खरं म्हणजे मला एसआरटी पद्धत माहिती नव्हती. त्यांनी मला एसआरटी पुस्तिका दिली आणि या पद्धतीने भात शेतीमधील मजुरी, वेळ आणि पैसा वाचवणे शक्य आहे हे समजाऊन सांगितले.

तसेच दैनिक ‘ॲग्रोवन’मध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा दाखविल्या, कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे सरांबद्दल माहिती दिली. त्यांच्या माध्यमातून भुतुंडे गावातील एसआरटी सेवक सिद्धार्थ कंक यांच्याशी ओळख झाली. त्यांनी माझ्या शेतात येऊन लागवडीबाबत माहिती दिली. परंतु चिखलणी न करता, रोपे न टाकता केवळ गादीवाफ्यावर बियाणे टोकून भात येईल का? यावर विश्‍वास बसत नव्हता. पण तंत्रज्ञान समजले होते.

‘एसआरटी’च्या दिशेने...

२०१७ मधील मे महिना. मी एसआरटी पद्धतीने भात लागवडीचे नियोजन केले. २० मे दरम्यानच्या कडक उन्हात एक एकर क्षेत्रावर गादीवाफे करण्यासाठी चुन्याची फक्की मारण्यास मी सुरुवात केली. माझ्या शेताजवळ एक लग्न कार्यालय होते. टळटळीत दुपारी शेतात कसल्या रेषा मारतोय, हे पाहायला वऱ्हाडी मंडळी उत्सुकतेने माझ्या शेतात आली.

त्यांना मी म्हणालो, की एसआरटी पद्धतीने भात लागवडीसाठी गादीवाफे तयार करतोय. ते म्हणाले, की याच्या काय नादी लागू नको, हे काय आपल्या भागात होणार नाही. पण माझे भाऊ म्हणाले, की आपण सुधारित पद्धतीनेच यंदा भात लागवड करायची, बघू काय होते ते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे गादीवाफे तयार केले. सिद्धार्थ कंक यांच्या मार्गदर्शनानुसार एसआरटी साचा वापरून इंद्रायणी भात बियाणे आणि खत पेरून घेतले.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com