Natural Farming : नैसर्गिक शेतीतून आर्थिक समृद्धी

Organic Farming : विनिता शाह यांनी या वेळी नैसर्गिक व बायोडायनॅमिक शेतीतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करीत शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली.
Natural Farming
Natural FarmingAgrowon
Published on
Updated on

Washim News : नैसर्गिक शेती ही केवळ शेतीपद्धती नाही, ती आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक समृद्धी यांचा संगम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा व शेतीची नवसंस्कृती जपावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांनी केले.

सर्ग विकास समितीच्या पुढाकाराने राज्यात या खरिपात सुरुवातीला राबविण्यात आलेल्या बायोडायनॅमिक कंपोस्ट स्पर्धा २०२५ च्या विजेत्यांना गुरुवारी (ता. १७) येथे सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, संस्था प्रमुख विनिता शाह, सर्ग विकास समितीचे संचालक राजेश तिवारी उपस्थित होते.

Natural Farming
Natural Farming : निसर्गपूरक शेती ः अडचणी आणि शक्यता

(कै.) संजय रोमन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित बायोडायनॅमिक कंपोस्ट स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार बाळादेवी जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी (वाडेगाव, जि. अकोला), ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन उत्पादक कंपनी (बिजूधावडी, जि. अमरावती), संतामाय नैसर्गिक शेती शेतकरी गट (व्याड, जि. वाशीम), उडान महिला बचत गट (बोरगाव, जि. भंडारा), दीपक वारकड (खरोळा, जि. वाशीम), सुधाकर धामणकर (जलंब, जि. बुलडाणा), धरमसिंग राठोड (चिचखेड, जि. अकोला),

श्रीकृष्ण लढे (देगाव, जि. अकोला), उद्धव शेळके (पिंप्री कोरडे, जि. बुलडाणा), उदय वाठ (पथ्रोट, जि. अमरावती), तर अधिकारी गटात संदीप सरनाईक (सहायक कृषी अधिकारी, व्याड, जि. वाशीम), जिजा नंदागवळी (गुंजेपार, जि. भंडारा) व अमोल खारोडे (तळेगाव बाजार, जि. अकोला) यांना मान्यरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Natural Farming
Natural Farming Policy : निसर्गपूरक शेतीसाठी धोरणात्मक पाठिंबा हवा

विनिता शाह यांनी या वेळी नैसर्गिक व बायोडायनॅमिक शेतीतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करीत शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली. या दरम्यान पीकविमा योजनांच्या पत्रकाचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या पत्रकातून शेतकऱ्यांना विमा योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमात सर्व विकास समितीचे पदाधिकारी, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तज्ज्ञ मार्गदर्शक अभिजित वंजारे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com