Reciprocal Tariff USA : ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात अमेरिकेतच मोठा विरोध

Protest Against Donald Trump's Trade Policy : विविध देशांवरील आयात शुल्कासह ट्रम्प यांची देशांतर्गत धोरणे, विविध प्रकारच्या आदेशांविरोधात सुमारे ५० राज्यांतील १२०० ठिकाणी जनता या मनमानीविरोधात शनिवारी (ता. ६) रस्त्यावर उतरली.
Protest Against Donald Trump
Protest Against Donald TrumpAgrowon
Published on
Updated on

Washington News : मोठ्या आवेशात जगभरातील देशांवर ‘रेसिप्रोकल टॅरीफ’च्या नावाखाली वाढीव ‘आयात कर’चा बडगा उगारणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतच ‘हँड्स ऑफ’ आंदोलनाच्या माध्यमातून मोठी निदर्शने सुरू झाली आहेत. विविध देशांवरील आयात शुल्कासह ट्रम्प यांची देशांतर्गत धोरणे, विविध प्रकारच्या आदेशांविरोधात सुमारे ५० राज्यांतील १२०० ठिकाणी जनता या मनमानीविरोधात शनिवारी (ता. ६) रस्त्यावर उतरली.

दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाचा अधिकार ग्रहण करताच ‘अमेरिका फस्ट’चा नारा दिला. यानंतर ट्रम्प यांनी २ एप्रिल २०२५ रोजी जगभरातील देशांवर नव्याने वाढीव आयात शुल्क लावून सर्वत्र खळबळ उडवून दिली. या ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ प्रणालीची ५ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जगभरातील व्यापार प्रभावित होण्यास प्रारंभ झाला होता.

मात्र या दरम्यान अमेरिकेतच यापूर्वीची शिक्षण, पेश्‍नन, मदत, सामाजिक न्याय आदी विषयांसंर्भातील निर्णयांसह देशातील वाढती महागाई बेरोजगारीमुळे जनता खूप त्रस्त झाली आहे. या विरोधात विरोधकांनी देशातील जनतेस आवाज देताच शनिवारी संतप्त लोकांनी अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये मोर्चे काढले आणि रॅली काढल्या.

Protest Against Donald Trump
India US Trade War: अमेरिकेचे व्यापारयुद्ध : शेतीमाल बाजारातील संधी अन्‌ धोके!

अमेरिकेतील ५० राज्यांसह नजीकच्या कॅनडा आणि मेक्सिको देशांतही याविरोधात गेल्या दोन दिवसांपासून निदर्शने करण्यात येताहेत. अमेरिकेभरातील सुमारे १२०० ठिकाणी शनिवारी हजारो प्रदर्शनकर्ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प याच्या आयात शुल्कवाढीच्या मुद्यांसह विविध धोरणे आणि आदेशांविरोधात रस्त्यावर उतरली. आयोजकांच्या मते, सुमारे १५० गटांनी समन्वित निदर्शनांमध्ये भाग घेतला, ज्यात वॉशिंग्टन डीसी आणि राष्ट्रपतींच्या फ्लोरिडा निवासस्थानाजवळ लक्षणीय गर्दी दिसून आली.

नागरी हक्क गट, विविध संघटना, माजी सैनिक संघटना आणि निवडणूक सुधारणा कार्यकर्त्यांसह १५० हून अधिक संघटनांनी १,२०० हून अधिक ‘हँड्स ऑफ’ निदर्शने आयोजित केली. या वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या धोरणांविरुद्ध निदर्शकांनी आवाज उठवला.

Protest Against Donald Trump
Trade War: व्यापार युद्धातील संकटे अन् संधी

ट्रम्प गोल्फ खेळण्यात व्यस्त

अमेरिकेत सर्वत्र निदर्शने सुरू असतानाच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शनिवारी काही काळ फ्लोरिडातील ज्युपिटर येथील त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये घालवला आणि नंतर दुपारी त्यांच्या मार-ए-लागो कंपाउंडमध्ये परतले.

उपक्रमांचे होईल नुकसान : व्हाइट हाउस

देशभरातील निदर्शनांनंतर व्हाइट हाउसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे. ते पात्र लाभार्थ्यांसाठी नेहमीच सामाजिक सुरक्षा, मेडिकेअर आणि मेडिकेअरचे संरक्षण करतील. दरम्यान, ‘डेमोक्रॅट्स’ची देशातील बेकायदेशीर परदेशी लोकांना सामाजिक सुरक्षा, मेडिकेअर आणि मेडिकेअर फायदे देण्याची भूमिका चुकीची आहे. यामुळे असे उपक्रम दिवाळखोरीत निघतील, अमेरिकन ज्येष्ठ नागरिक यामुळे भरडले जातील.

‘‘मला महात्मा गांधींपासून खूप प्रेरणा मिळाली आहे. आज मी इथे आहे, कारण ‘आपलाच महासागर आणि आपलेच मीठ आहे...’ जागतिक व्यापार आणि देवाणघेवाणीबद्दल, जगाकडे एकमेकांना देण्यासारखे खूप काही आहे... ‘माझाच पहिला देश, माझेच पहिले उत्पादन’ हा लोभ जगासाठी आणि मानवतेसाठी टिकाऊ नाही.’’
- एक प्रदर्शनकर्ता
‘‘मी येथे अशा सर्व लोकांना पाठिंबा देण्यासाठी आहे जे त्यांच्या नोकऱ्या, आरोग्य विमा, वैद्यकीय सेवा, सामाजिक सुरक्षा, घर, अन्न यासाठी लढत आहेत. पैसे नसल्याने लोक त्रास सहन करत आहेत... अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.’’
- एक प्रदर्शनकर्ता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com