Beekeeping : उत्पादनवाढीकरिता मधमाशीपालन आवश्यक

Crop Productivity : मधमाशीमुळे पिकांमध्ये उत्तमरित्या परागीभवन होते. त्यामुळे चांगले आणि अधिक उत्पादन मिळते, यासाठी मधमाशींची संख्या कशी वाढेल, याकडे लक्ष द्यावे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॅा. सी.एस. पाटील यांनी मोहोळ येथे व्यक्त केले.
Beekeeping
Beekeeping Agrowon
Published on
Updated on

Solapur News : मधमाशीमुळे पिकांमध्ये उत्तमरित्या परागीभवन होते. त्यामुळे चांगले आणि अधिक उत्पादन मिळते, यासाठी मधमाशींची संख्या कशी वाढेल, याकडे लक्ष द्यावे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॅा. सी.एस. पाटील यांनी मोहोळ येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत ‘पश्चिम महाराष्ट्रमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन, उच्च प्रतीचे मधमाशी, बीज केंद्राच्या विकास आणि मधू वनस्पतीची/फुलोरा यांची लागवड’ या प्रकल्पांतर्गत मोहोळचे कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी तंत्र विद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी सात दिवसीय शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Beekeeping
Beekeeping : मधमाश्यांकडून शिकूया काही ‘मॅनेजमेंट टिप्स’

त्यावेळी प्रा.डॅा. पाटील बोलत होते. विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन. जे. रणशूर, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॅा. जे.डी. जाधव, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, मोहोळच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. व्ही आर पाटील, खादी व ग्रामोद्योग विभागाचे व्यवस्थापक ध्रुवकुमार बनसोडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॅा.तानाजी वळकुंडे, महाबळेश्वरच्या मधसंचालनालयाचे संचालक दिग्विजय पाटील उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. वळकुंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. विशाल वैरागर व आभार प्रदर्शन डॉ. पंकज मडावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी. के. पलव्हेनचा, प्रा. दिनेश क्षीरसागर, डॉ. शरद जाधव, डॉ. सूरज मिसाळ, सुयोग ठाकरे, नीलेश सोनवणे, नितीन बागल, ज्ञानेश्वर तांदले, संजय बनसोडे, रवी साखरे आदींनी परिश्रम घेतले.

Beekeeping
Beekeeping : मधुमक्षिका पालनाचे आव्हान

तांत्रिक चर्चासत्रांसह अभ्यास सहलही

आठ दिवसांच्या या प्रशिक्षणात मधमाशीच्या विविध प्रजाती आणि जीवनक्रम, सातेरी मधमाशीचे संगोपन शास्त्र, मधमाशी वसाहतीचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन, मधमाशीपालनातून उत्पादने, साठवणूक, मूल्यवर्धन आणि उपयोग, परागीभवनामध्ये मधमाशांची भूमिका आदी विषयावर तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले.

तसेच प्रात्यक्षिकामध्ये, मधमाशांची हाताळणी मधमाशीचे नैसर्गिक शत्रू व रोग, मधमाशांना आवश्यक कृत्रिम खाद्यपुरवठा यावरही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथील मधुमक्षिका पालन केंद्रास प्रात्यक्षिक सहल भेटीचे आयोजन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com