Nashik Dam Water Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणात २९ टक्के अधिकचा पाणीसाठा

Dam Water Storage : यंदा जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील २४ मध्यम व मोठ्या धरण प्रकल्पांत पाणीसाठा समाधानकारक आहे. एकूण संकल्पित पाणीसाठा ६५,६६४ दलघफू असून यंदा सोमवारअखेर (ता. १३) ५६,६८२ दलघफू उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
Water Storage in Dams
Water Storage in DamsAgrowon
Published on
Updated on

नाशिक : यंदा जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील २४ मध्यम व मोठ्या धरण प्रकल्पांत पाणीसाठा समाधानकारक आहे. एकूण संकल्पित पाणीसाठा ६५,६६४ दलघफू असून यंदा सोमवारअखेर (ता. १३) ५६,६८२ दलघफू उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. चालुवर्षी ही टक्केवारी ८६.३२ असून मागील वर्षीच्या तुलनेत २९.४६ टक्के इतका अधिक साठा उपलब्ध आहे.

मागील वर्षी दुष्काळाच्या झळा जाणवल्या तर पाणीसाठा अत्यंत कमी प्रमाणावर होता. जानेवारीपासून अनेक ठिकाणी दुष्काळाचे चटके होते. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून दिलासादायिक चित्र आहे. मागील वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या सप्ताहात हा पाणीसाठा ५६ टक्क्यांवर होता. तर यंदा हा साठा ८६ टक्क्यांवर असल्याने यंदा पाणीबाणी भासणार नाही, तसेच पाणी कपातीचे संकट नसेल.

Water Storage in Dams
Yeldari Dam Water Storage : येलदरी धरणात ५९.६३ टक्के जिवंत पाणीसाठा

गंगापूर धरण समूहात यंदा पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे. नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात यंदा १७ टक्के अधिक पाणीसाठा आहे. काश्यपी, आळंदी धरणात पाणीसाठा मागील वर्षाप्रमाणे स्थिर आहे. तर गौतमी गोदावरी धरणात ३१ टक्क्यांनी साठा घटलेला आहे. पालखेड समूहातील पालखेड धरणात साठा  सध्या स्थिर आहे. तर करंजवनमध्ये ३९ टक्के अधिक आहे. तर वाघाड धरणात दुप्पट आहे. ओझरखेड, पुणेगावची स्थिती चांगली आहे. तिसगाव धरणात ४४ टक्के साठा अधिक आहे. पश्चिम पट्ट्यात मोठ्या दारणा धरणात ३५ टक्के तर भावलीत दुपटीने साठा आहे. मुकणे धरणात वाढ आहे. वालदेवीचा साठा स्थिर तर कडवा धरणात दुप्पट साठा आहे. भोजापूर धरणात साठ्याच्या चार पट यंदा उपलब्धता आहे.

गिरणा धरण समूहात यंदा सकारात्मक परिस्थिती
गिरणा धरण समूहातील चणकापूर धरणसाठ्यात २ टक्क्यांनी, हरणबारीत २६ टक्के, केळझरमध्ये २८ टक्क्यांनी वाढ आहे. मागील वर्षी नागासाक्या धरण कोरडे होते. यंदा मात्र ९७ टक्के साठा असल्याने सकारात्मक चित्र आहे. जिल्ह्यात सर्वांत मोठ्या गिरणा धरण समूहात यंदा ८५ टक्के असून मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने आहे. पूनद धरणाचा साठा स्थिर तर सर्वांत लहान असणाऱ्या माणिकपुंजमध्ये यंदा ६० टक्के अधिक पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणसाठ्याची तुलनात्मक स्थिती
 (ता. १३ जानेवारी अखेर/द.ल.घ.फू.)

धरण उपयुक्त साठा पाणीसाठा(२०२४) टक्केवारी पाणीसाठा (२०२५)
टक्केवारी वाढ/घट
गंगापूर ५,६३० ३,८५० ६८.२१ ४,८३३ ८५.८४
कश्यपी १,८५२ १,७८५ ९६.३८ १,८११ ९७.७९
गौतमी गोदावरी १,८६८ १,५३७ ८२.२८ ९५४ ५१.०७
आळंदी ८१६ ६०७ ७४.३९ ६४३ ७८.८०
 पालखेड ६५३ ४६७ ७१.५२ ४६६ ७१.३६
करंजवण ५,६७१ २९४५ ५४.८३ ५०३१ ९३.६७
वाघाड २,३०२ ९६३ ४१.८३ १,९१२ ८३.०६
ओझरखेड २,१३० १,०६७ ४९.६२ १,९२८ ९०.५२
पुणेगाव ६२३ ३७५ ६०.१९ ४८७ ७८.१७
तिसगाव ४५५ १६३ ३५.८२ ३६६ ८०.४३
दारणा ७,१४९ ३,९६१ ५५.४१ ६,४८३ ९०.६८
भावली १,४३४ ६७८ ४७.२८ १,३६१ ९४.९१

मुकणे ७,२३९ ४,१६८ ५७.५८ ५,३४५ ७३.८४
वालदेवी १,१३३ १,०६० ९३.५६ १,०६३ ९३.८२
कडवा १,६८८ ६४२ ३८.०२ १,५११ ८९.५१
भोजापूर ३६१ ५९ २१.८८ ३०४ ८४.२१
चणकापूर २,४२७ २,३२८ ९५.९२ २,३७१ ९७.६९
हरणबारी १,१६६ ८०९ ६९.३८ १,१२३ ९६.३१
केळझर ५७२ ३७९ ६६.२६ ५४३ ९४.९३
नागासाक्या ३९७ ० ० ३८६ ९७.२३
गिरणा १८,५०० ७,८७१ ४२.५५ १५,९०९ ८५.९९
पुनद १,३०६ १,२८३ ९८.२४ १,२८३ ९८.२६
माणिकपुंज ३३५ ९३ २७.८५ ३१२ ९३.११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com