Soil and Water Conservation Department : जलसंधारण अधिकारी पदांची परीक्षा रद्द

Exam Cancellation Update : २० आणि २१ फेब्रुवारी रोजी टीसीएस या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य सरकारने शुक्रवारी (ता. १५) घेतला.
Soil and Water Conservation Department
Soil and Water Conservation DepartmentAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : अमरावती येथील एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याने जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित पदांसाठी २० आणि २१ फेब्रुवारी रोजी टीसीएस या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य सरकारने शुक्रवारी (ता. १५) घेतला.

फेरपरीक्षेबाबत व आनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील, असेही मृदा व जलसंधारण विभागाचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली आहे. मृद्‌ व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदे सरळसेवेने भरण्यासाठी टीसीएस मार्फत राज्‍यातील २० जिल्ह्यांतील एकूण ६६ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

Soil and Water Conservation Department
Water Conservation : भूजल संवर्धनासाठी ३६ गावांचा होणार गौरव

या परीक्षेत अमरावती एआरएन असोसिएट येथील परीक्षा केंद्रावर यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्राच्या झेरॉक्स प्रतीवर खालील बाजूस ए,बी,सी,डी अशा स्वरूपात उत्तरेसदृश माहिती असल्याचे आढळून आले होते. या आनुषंगाने, गृह विभागाच्या अहवालानुसार अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Soil and Water Conservation Department
Water Conservation : टंचाईच्या संकटात साठवण क्षमतावाढीसाठी उपाययोजना

या गुन्ह्यात पोलिस अहवालानुसार आजपर्यंत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये टीडीएस कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व एआरएन, ड्रीमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर या ऑनलाइन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या टीडीएस कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. राज्यभरातील स्थापत्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने नमते घेत अखेर ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com