Nashik Agriculture Department : ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कृषी निविष्ठा विक्री करावी, नाशिक कृषी विभागाचे आवाहन

Agriculture Department : ई-पॉस ऑनलाइन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतसाठा याची दररोज पडताळणी करावी. खतांचे लिंकिंग करून शेतकऱ्यांना अनावश्‍यक कृषी निविष्ठांची सक्ती करू नये.
Nashik Agriculture Department
Nashik Agriculture Departmentagrowon
Published on
Updated on

Nashik Krushi Seva Kendra : बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची विक्री करताना ऑनलाइन प्रक्रिया आत्मसात करून कायद्यातील तरतुदींप्रमाणे कृषी निविष्ठांचे उत्पादन व विक्री करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे कृषी उत्पादन घेता येईल. बियाणे विक्रीसाठी बनविलेल्या ‘साथी’ या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी केले.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते यांची खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मंगळवारी (ता. ५) करण्यात आले. या वेळी बोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत निविष्ठा विक्रीच्या अनुषंगाने सूचना केल्या. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे (नाडा) अध्यक्ष अरुण मुळाणे, रामभाऊ माळोदे आदी उपस्थित होते.

Nashik Agriculture Department
Nashik Rain Damage: वादळी वारे, मॉन्सूनपूर्व पाऊस, गारपिटीने नाशिकमध्ये दाणादाण

बोरकर म्हणाले, ई-पॉस ऑनलाइन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतसाठा याची दररोज पडताळणी करावी. खतांचे लिंकिंग करून शेतकऱ्यांना अनावश्‍यक कृषी निविष्ठांची सक्ती करू नये. कीटकनाशक विक्री करताना लेबल क्लेम तपासूनच आणि कायद्यातील अधिसूचनेप्रमाणे पक्के बिल शेतकऱ्यांना अदा करावे. भविष्यात चुकीच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्ष रहावे.

सुभाष काटकर म्हणाले, की निविष्ठा विक्री करताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व सल्ला द्यावा. आवश्‍यक असेल तशाच निविष्ठांची विक्री वा शिफारस करावी. म्हणजेच शेतकरी पुन्हा माध्यमातून दर्जेदार कृषी निविष्ठांचा वापर हा खर्च कमी करून उत्पादनात वाढ होईल. मुळाणे म्हणाले, की दर्जेदार खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीबरोबर तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा विकास हेच आपले ध्येय असले पाहिजे. कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.

ते म्हणाले, की जिल्ह्यात पेरणी होणारे क्षेत्र त्यासाठी आवश्‍यक खते, बियाणे आणि कीटकनाशके यांचा सुरळीत पुरवठा होऊन खरीप हंगामात शेतकऱ्यांना कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुरवठा करावा. या बाबत प्रत्येक तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण वर्गात फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कृषी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या घडीपत्रिका व पोस्टर्स यांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर. डी. वाघ, मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी, तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) उल्हास ठाकूर, कृषी अधिकारी राहुल आहेर, सुनील विटनोर, संतोष राठोड, किशोर आहिरे, नंदकुमार अहिरे, बाळासाहेब खेडकर, भिष्मा पाटील, महेश नागपूरकर, कैलास भदाणे, प्रणय हिरे, विजय केदार यांच्यासह ‘नाडा’चे प्रतिनिधी, माफदा, ओमा या संघटनेचे प्रतिनिधी व जिल्ह्याचे कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेते उपस्थित होते. विजय धात्रक यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com