Drought Review : गेडाम यांनी सूत्रे स्वीकारताच घेतला दुष्काळाचा आढावा

Agriculture Commissioner : कृषी आयुक्तपदाची सूत्रे डॉ. गेडाम यांनी मावळते आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून शुक्रवारी (ता.२०) स्वीकारली. डॉ. गेडाम यांनी हारतुरे स्वीकारण्याऐवजी लगेच राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेतली.
Dr. Pravin Gedam
Dr. Pravin GedamAgrowon
Published on
Updated on

Pune News : दुष्काळासंबंधीचे जिल्हा समित्यांचे सर्व अहवाल एकत्र करून त्याचा अभ्यास आणि मूल्यांकन केले जाणार आहे. त्यानंतर एकत्रित अहवाल राज्य शासनाला पाठविले जाईल. ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना नवनियुक्त कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.

कृषी आयुक्तपदाची सूत्रे डॉ. गेडाम यांनी मावळते आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून शुक्रवारी (ता.२०) स्वीकारली. डॉ. गेडाम यांनी हारतुरे स्वीकारण्याऐवजी लगेच राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती आस्था आणि नियोजनात्मक कामाला प्राधान्य, असा संदेश क्षेत्रिय पातळीवर गेला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dr. Pravin Gedam
Agriculture Commissioner : डॉ. प्रवीण गेडाम यांची कृषी आयुक्तपदी नियुक्ती

मंत्रालयातून गुरुवारी (ता.१९) अचानक निघालेल्या आदेशानुसार श्री. चव्हाण यांची बदली करीत राज्याच्या जलसंधारण सचिवपदी नियुक्ती केली गेली. तसेच रिक्त जागेवर केंद्रीय सेवेतील सनदी अधिकारी श्री. गेडाम यांची नियुक्ती झाली. श्री. गेडाम यांनी नियुक्तीनंतर एक दिवसाही वेळ न दवडता पदाची सूत्रे तातडीने स्वीकारली आणि कामाला सुरवातदेखील केली.

आयुक्त कक्षातून ते तडक सभागृहात गेले व तेथे त्यांनी राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक घेतली. या वेळी कृषी संचालक दिलीप झेंडे (विस्तार), विकास पाटील (गुणनियंत्रण), डॉ. कैलास मोते (फ्लोटपा), रवींद्र भोसले (मृद्संधारण), सुभाष नागरे (प्रक्रिया), सहसंचालक विनयकुमार आवटे (पीकविमा) व उदय देशमुख (संगणक प्रकल्प) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Dr. Pravin Gedam
Drought Condition : दुष्काळ तालुका निवडीत मंगळवेढ्यावर अन्याय

दुष्काळी स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा व राज्यस्तरीय समित्या कार्यान्वित केल्या आहेत. राज्यस्तरीय देखरेख समितीचे अध्यक्षपद डॉ. गेडाम यांच्याकडे आहे. सध्या राज्यात २४ जिल्ह्यांमधील अनेक मंडलांमध्ये खरिपाची पिके वाया गेली आहेत.

तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती घोषित केली आहे. त्यामुळे या स्थितीचा आढावा डॉ. गेडाम यांनी घेतला. दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणांनी वापरलेले शास्त्रीय निर्देशांक व त्यानुसार आलेल्या अहवालांची संक्षिप्त माहिती या बैठकीत देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com