Soybean Sowing : साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज

Kharif Season 2025 : मराठवाड्यात सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेला जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत असते.
Sowing
Sowing Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. तीन लाख ५३ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये चार लाख ५३ हेक्टरवर सोयाबीन तर कपाशीचे दोन लाख दहा हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात सात लाख ७८ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेला जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याची ओळख आहे. यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत असते. याबरोबरच कपाशीचीही लागवड नांदेड जिल्ह्यात होते. आगामी २०२५ या खरीप हंगामात चार लाख ५३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Sowing
Safflower Sowing : रब्बी हंगामात करडईची पेरणी वाढली

जिल्ह्यातील कपाशीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख ४१ हजार हेक्टर असताना यात यंदाही घट होऊन दोन लाख १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र सात लाख ६४ हजार ५९९ हेक्टर आहे.

Sowing
Summer Sowing : साडेतीन लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

कृषी विभागाने आगामी खरीप हंगामात सात लाख ७८ हजार १६२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे. तर तूर ६३ हजार ५०० हेक्टर, मूग २० हजार २५० हेक्टर, उडीद २० हजार ५०० हेक्टर, मका १०१२ हेक्टर, कारळ ४१० हेक्टर, बाजरी ४० हेक्टर तर ज्वारी आठ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

आगामी खरीप हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र

(क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र

सोयाबीन ३,५३,३१२ ४,५३,५००

कपाशी २,४१,२८२ २,१०,०००

तूर ६७,४२३ ६३,५००

उडीद २९,६२५ २०,५००

ख. ज्वारी ४४,७४० ८,०००

मूग २७,३९२ २०,५००

मका ८२५ ४१०

एकूण ७,६४,५९९ ७,७८,१६२

आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला लागणाऱ्या बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच रासायनिक खतांचा पुरवठाही शासनाकडून मंजूर झाला आहे. आगामी खरीप हंगामात सोयाबीनसह कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. तर ज्वारी, मूग, उडीद व मक्याचे पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
- निलकुमार ऐतवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com