Summer Sowing : साडेतीन लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

Summer Crops : राज्यात एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली असताना पाणी उपलब्ध असलेल्या भागात मात्र उन्हाळी पेरणी जोरात झाली आहे.
Summer Sowing
Summer Sowing Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : राज्यात एकीकडे पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली असताना पाणी उपलब्ध असलेल्या भागात मात्र उन्हाळी पेरणी जोरात झाली आहे. यंदा मार्च महिन्याच्या मध्यातच सरासरी ओलांडली असून आतापर्यंत २ लाख ५९ हजार ४८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. आतापर्यंतच्या पेरणीचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा यंदा ८० हजार हेक्टर अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिके पेरली आहेत.

राज्यात उन्हाळी पिकांचे ३ लाख ५९ हजार ७५९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. उन्हाळी पिकांत प्रामुख्याने भात, मका, बाजरी, भुईमूग, तीळ ही पिके घेतली जातात. गतवर्षी चांगल्या पावसामुळे यंदा उशिरापर्यंत पाणी टिकेल असे वाटप असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत कांदा लागवड जोरात केली. मात्र फेब्रुवारीपासून पाणीपातळी झपाट्याने खाली गेली. त्याचा अनेक पिकांना फटका बसत आहे.

Summer Sowing
Summer Sowing : चार हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

सध्या पाणी टंचाईच्या झळा जोरात बसत असताना ज्या भागात धरणांचे अथवा अन्य स्त्रोताचे पाणी उपलब्ध आहे, त्या भागात मात्र उन्हाळी पिकांची पेरणी जोरात झाली आहे. यंदा मात्र मार्चमध्येच उन्हाळी पीक पेरणीने सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत राज्यात २ लाख ५९ हजार ४८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

आतापर्यंतच्या पेरणीचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा यंदा ८० हजार हेक्टर अधिक क्षेत्रावर उन्हाळी पिके पेरली आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा भाताची पेरणी काहीशी कमी आहे. मात्र बाजरी, मका, उडदाची दुपटीने तर भुईमुगाचे अडीच पटीने पेरणी अधिक झाली आहे. सूर्यफुलाचे क्षेत्रही यंदा बऱ्यापैकी वाढले आहे.

Summer Sowing
Summer Crop Sowing : उन्हाळी पिकांची १७ हजार हेक्टरवर पेरणी

जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापुर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र अधिक आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक ७० हजार हेक्टरच्या जवळपास उन्हाळी पिके असून भंडारा, यवतमाळ, जिल्ह्यांत ३२ हजार हेक्टरच्या जवळपास उन्हाळी पिके आहेत.

उन्हाळी पीक निहाय क्षेत्र (हेक्टर)

भात ः १,२०,८७३

मका ः ६६,०२२

ज्वारी ः २५,३१७

बाजरी ः २९,१२३

इतर तृणधान्य ः १,६१७

मुग ः ७,१०३

उडीद ः १,१९६

इतर कडधान्य ः १,१०९

भुईमूग ः ७४,५३८

सूर्यफूल ः ४,२६०

तीळ ः २३,६४६

सोयाबीन ः ३६२५

इतर गळीतधान्य ः ३५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com