
Nanded News : नांदेड : रब्बी हंगाम २२३ मधील राज्यस्तरीय पीकस्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत करडईच्या पिकात राज्यस्तरीय पहिले व दुसरे पारितोषिक तर रब्बी ज्वारी या पिकाचे उत्पादनाबाबतीत योग्य नियोजन करून भरघोस पीक घेणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय पारितोषिक पटकावले आहेत.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
या पीकस्पर्धेत लोहा तालुक्यातील सायाळ येथील कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जाणारे शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांनी जिल्ह्यातून रब्बी ज्वारीमध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून तीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. तसेच करडई या पिकामध्ये चैनपूर (ता. देगलूर) येथील माधव शंकरराव पाटील यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम पन्नास हजार रुपयाचे पारितोषिक पटकावले आहे. तर देगलूर तालुक्यातीलच कुडली येथील सुनील नामदेव चिमणपाडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रोख चाळीस हजार रुपयांचे पारितोषिक मिळवण्याचा बहुमान मिळविला आहे. शेती क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला.
राज्यस्तरावर करडई या पिकात प्रथम व द्वितीय क्रमांक व रब्बी ज्वारी या पिकात तृतीय क्रमांक आल्याबद्दल दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
२०२१ मध्ये करडईचे तीनही राज्यस्तरीय बक्षीस
रब्बी हंगाम २०२१ साठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन केले होते. यात प्राप्त झालेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीवरून करडईचे राज्यस्तरीय तिन्ही पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याला मिळाले आहेत. राज्य शासन पीक उत्पादनात स्पर्धात्मक वाव मिळावा यासाठी पीक स्पर्धा आयोजित करते. रब्बी हंगाम २०२१ मध्ये रब्बी हंगामातील पिकाच्या उत्पादकता वाढविण्यासाठी या पीक स्पर्धेचे आयोजन केले होते. यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. देगलूर) यांना करडईचे उत्पादन हेक्टरी २८ क्विंटल ८३ किलो आल्याने त्यांना प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. तर २४ क्विंटल एक किलो हेक्टरी उत्पादन आल्याने करेमलकापूर (ता. देगलूर) येथील राजेश रामराव जमादार यांचा राज्यात दुसरा क्रमांकाने बहुमान झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.