Research Center Award : नांदेड कापूस संशोधन केंद्रास ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार

Nanded Cotton Research Center : नांदेड कापूस संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्पातर्फे ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या बहुमानाने गौरविण्यात आले आहे.
Indian Council of Agricultural Research Deputy Director General (Crops) Dr. Tilakraj Sharma
Indian Council of Agricultural Research Deputy Director General (Crops) Dr. Tilakraj SharmaAgrowon

Nanded News : नांदेड कापूस संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्पातर्फे ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या बहुमानाने गौरविण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्याद्वारे आयोजित अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्पाच्या वार्षिक कार्यशाळेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (पिके) डॉ. तिलकराज शर्मा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर विविध समन्वित संशोधन प्रकल्प राबविण्यात येतात. यापैकी कपाशीवरील अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्प हा एक प्रमुख प्रकल्प आहे. कपाशीच्या प्रकल्पातर्गत देशभरामध्ये २२ प्रमुख संशोधन केंद्र व १० उपकेंद्र कार्यरत आहेत.

Indian Council of Agricultural Research Deputy Director General (Crops) Dr. Tilakraj Sharma
Agriculture Research Center : कृषी संशोधन केंद्राचा पाणीपुरवठा १८ दिवस बंद

या प्रकल्पातर्फे यावर्षीपासून प्रथमच उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार सुरू करण्यात आला. या पहिल्या पुरस्काराचा मान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कापूस संशोधन केंद्राने पटकाविला आहे.

Indian Council of Agricultural Research Deputy Director General (Crops) Dr. Tilakraj Sharma
Cotton Research Center : केंद्रिय कापूस संशोधन संस्थेत मिळणार कृषी शिक्षणाचे धडे

वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ हंगामामध्ये या संशोधन केंद्राद्वारे बीटी कपाशीचे तीन सरळ वाण (एनएच १९०१ बीटी, एनएच १९०२ बीटी व एनएच १९०४ बीटी), एक अमेरिकन वाण (एनएच ६७७) व दोन देशी, सरळ वाण (पीए ८३७ व पीए ८३३) असे एकूण सात वाण प्रसारित केले आहेत. तसेच पीक लागवड, हवामान बदलामध्ये लागवडीचे अंतर, सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादीबाबत चार शिफारशी दिल्या आहेत.

याशिवाय राष्ट्रीय प्रयोगांमध्ये प्राधिकृत वाणांची संख्या, कृषिविस्तार, प्रात्यक्षिके व प्रशिक्षणांचे आयोजन इत्यादी बाबतीत सरस काम आढळून आले. संशोधन केंद्राच्या कामकाजासाठी कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणि यांचे मार्गदर्शन व माजी संशोधन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व डॉ. जहागीरदार, इतर संचालक आणि विद्यापीठातील अन्य केंद्राच्या प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहयोगामुळेच प्राप्त झाला असल्याचे मत संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. खिजर बेग यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com