Sustainable Agri Research : कृषीसंबंधित तरुणाईच्या संशोधकवृत्तीला मिळाली चालना

Agriculture Research : कृषी क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांवर पर्याय देण्यासाठी अनेक तरुण संशोधक नावीन्यपूर्ण संशोधन करत आहेत.
Agriculture Research
Agriculture Research Agrowon
Published on
Updated on

Gandhinagar News : कृषी क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांवर पर्याय देण्यासाठी अनेक तरुण संशोधक नावीन्यपूर्ण संशोधन करत आहेत. म्हणूनच या संशोधकवृत्तीला चालना देण्यासाठी सोल्यूबल फर्टीलायझर इंडस्ट्री असोसिएशन यांच्या वतीने ‘थिसिस शो डाऊन’या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये देशभरातून प्रबंध सादरीकरणासाठी ५० जणांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ४ संशोधकांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये नागपूर येथील लक्ष्मीनारायण इनोवेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची संशोधक नेहा ठाकरे राष्ट्रीय स्तरावर विजेती ठरली.

भारत सरकारच्या तांत्रिक आणि संशोधन उपक्रमांशी संबंधित तरुण संशोधकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.गांधीनगर येथे महात्मा मंदिर येथे आयोजित ‘सोम्स २०२५’ या कृषी उद्योजकता संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिषदेत संशोधनसंबंधी सादरीकरण करण्यात आले.

यात नेहा ठाकरे विजेती ठरली. तिने औद्योगिक कचऱ्यापासून अमोनिया पुनर्प्राप्त करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. तिच्या संशोधनाबद्दल ५० हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. श्रीनगर(काश्मीर) येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील कृषी यांत्रिकीकरण आणि वीज अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शौकत रसूल यांनी दुसरा क्रमांक पटकाविला.

‘सफरचंद बागांसाठी स्मार्ट स्प्रेअर’ तयार केलेला आहे. यासंबधी रिअल टाइममध्ये कॅनॉपीनुसार कीटकनाशकांची फवारणी व अचूक नियोजन यासाठी तो उपयुक्त आहे.त्यामुळे रसायनांचा वापर कमी होऊन फवारणी कार्यक्षमता वाढते.

Agriculture Research
Agriculture Research: जनुकीय संपादनात नवक्रांतीची चाहूल

तिसरा क्रमांक तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या मदुराई कृषी महाविद्यालय आणि संशोधन संस्थेचे अब्दुल रहमान याने पटकाविला.समुद्री शैवालमधून नॅनो फॉस्फरस आणि तांदळाच्या भुसापासून आकारहीन सिलिका काढण्यावर संशोधन केंद्रित आहे. त्यास १५,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

Agriculture Research
Agriculture Research: प्रखर उन्हात तग धरणारी तुरीची जात विकसित

तामिळनाडू कृषी विद्यापीठातील पेरियाकुलम उद्यानविद्या महाविद्यालय व संशोधन केंद्राचा संशोधक विद्यार्थी जीवा. जी यास उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. चमेली उत्पादन वाढीसाठी मातीचे निदान करून आणि पोषक सूत्रांची रचना असे संशोधन त्याचे होते.

कृषी संशोधन व प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन केंद्राचे माजी अतिरिक्त संचालक डॉ. प्रांजीब चक्रवर्ती, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था कोलकाता विभागाचे संचालक डॉ. पी. के. डे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, बायोअ‍ॅग्री इनपुट प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. के. आर. रेड्डी यांनी कामकाज पाहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com