
गोपाल हागे
ॲग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाच्या (नाफेड) वतीने राज्यात सुरू असलेल्या तूर खरेदीच्या नोंदणीला १५ दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २४ फेब्रुवारीपासून ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. याची मुदत सोमवारी (ता. २४) संपली होती. त्यामुळे आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने तूर उत्पादकांना नाव नोंदणीचा लाभ घेता येणार आहे.
पणन विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, नोंदणी प्रक्रिया १५ दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या तूर उत्पादनाची नोंदणी करण्यासाठी अधिक वेळ यामुळे मिळेल. ते त्यांचे उत्पादन नोंदवू शकतील.
सद्यःस्थितीत तुरीचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमी असून देखील शेतकऱ्यांचा यंदा हमीभावाने तूर विक्रीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. तरीही तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत किमान आधारभूत योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली.
तूर खरेदीला प्रतिसाद कमी
यंदा बाजारात तुरीला हमीभावापेक्षा दर कमी आहे. तरीही शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी कमी प्रमाणात येत असल्याची स्थिती आहे. यंदाच्या मोसमात मंगळवार (ता. २५) पर्यंत खरेदीदार सर्व एजन्सी मिळून ७५ हजार ८८५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी १० हजार ५६४ शेतकऱ्यांची एक लाख ५५ हजार ३४७ क्विंटल तूर खरेदी झालेली आहे. यात पणन विभागाच्या केंद्रावर सर्वाधिक ७८ हजार ५०८ क्विंटल, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ३६८२७ क्विंटल, पृथाशक्तीने २४ हजार ५ क्विंटल, महाकिसान संघाने ९५३० क्विंटल, महाकिसान वृद्धीने ६४५० क्विंटल तुरीची खरेदी केलेली आहे.
राज्यात तूर खरेदीसाठी ५०७ केंद्रांना मंजुरी दिलेली असून, त्यापैकी ४९३ केंद्र प्रत्यक्ष सुरू झालेले आहेत. ‘नाफेड’ सोबतच ‘एनसीसीएफ’ तर्फेही राज्यात १६० ठिकाणी केंद्र चालवले जात आहेत. या केंद्रावर १३५०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून आतापर्यंत ४५८९ शेतकऱ्यांची ४९ हजार ६३४ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. राज्यात तूर उत्पादकांची मोठी संख्या असून तांत्रिक कारणाने शेतकरी याकडे पाठ फिरवत आहेत. आजवर सुमारे ८९ हजार शेतकऱ्यांनीच नोंदणी केलेली आहे.
तुरीचा हमीदर - ७५५० रुपये
बाजार दर- किमान ५५००, कमाल ७६९५, सरासरी ७२५० रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.