Chandrapur News : धान पिकास गेल्यावर्षीच्या हंगामात प्रतिएकर २१ हजार १०० रुपयांप्रमाणे पीककर्ज वितरण करण्यात आले. यावर्षी यात अल्पशी वाढ करीत २३ हजार १०० रुपयांचे पीककर्ज दिले जाणार आहे.
पिकाची उत्पादकता, त्यावरील खर्च या बाबींची दखल घेत संबंधित पिकाकरिता शासनस्तरावर पीककर्जाचा दर निश्चित केला जातो. यंदा २७ मार्च २०२४ रोजी शासनाकडून पीककर्ज दरपत्रक निश्चित करण्यात येऊन ते बॅंकांना पाठविण्यात आले आहे. त्यानुसार यंदा धान पिकाच्या कर्जात अल्पशी वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार गेल्या हंगामात प्रतिएकर २१ हजार १०० रुपये असा दर असताना यंदा २३ हजार १०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. दरवर्षी साधारणपणे २० एप्रिलपासून पीककर्ज वितरणास सुरुवात होते. यावर्षी एप्रिलच्या अखेरीस पीककर्ज वितरण सुरुवात होईल, असा अंदाज आहे.
जूनमध्ये धान लागवड होत असली तरी त्यासाठीची मशागत व इतर कामे एप्रिलपासून सुरू होतात. त्यामुळे जुन्या कर्जाचा भरणा करून शेतकरी नवे कर्ज घेतात. गावातील सेवा सेसायटी तसेच आदिवासी विविध कार्यकारी सोसायटींकडे पीककर्जाची मागणी होते.
उपलब्ध पीककर्ज अपुरे
धान पिकाला लागवडीपासून तर पीक हाती येईपर्यंत विविध प्रक्रियांना सामोरे जावे लागते. यात पऱ्हे (रोपवाटिका), निंदणी, कापणी, बांधणी, मळणी या घटकांचा समावेश आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या नियंत्रणावरही मोठा खर्च होतो. त्यामुळे धान पिकासाठी उपलब्ध होणारे पीककर्ज अपुरे असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
उसासाठी ५३ हजार ५०० रुपये
धान पिकाला २३ हजार २०० रुपये प्रतिएकर असा दर निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकासाठी प्रतिएकर ५३ हजार ५०० रुपये पीककर्ज मिळणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.