Agriculture Credit Supply : कृषी, उद्योगांसह विविध संस्थांना वित्तपुरवठा करा

Jitendra Dudi : विविध संस्थांना वित्तपुरवठा करावा. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठी दिलेले बँक शाखानिहाय उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
Agriculture Business
Agriculture BusinessAgrowon

Satara News : जिल्ह्याला वित्त आराखडा दिला आहे. या आराखडा जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या आराखड्यानुसार कृषी, उद्योग यासह विविध संस्थांना वित्तपुरवठा करावा. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठी दिलेले बँक शाखानिहाय उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांन केल्या.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत त्यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीस आरबीआयचे व्यवस्थापक विजय कोरडे,

Agriculture Business
NABARD Finance : नाबार्डच्या अर्थसाह्यातून शेतकऱ्यांना नवी दिशा

जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, महाराष्ट्र बँकेचे उपअंचल प्रबंधक मिलिंद होळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

Agriculture Business
Onion Market : आळेफाटा येथे कांदा लिलाव पाडले बंद

श्री. डुडी म्हणाले, की आरसेटी मार्फत प्रशिक्षण दिलेल्या युवक-युवतींना प्रशिक्षणानंतर उद्योग उभारणीसाठी बँकांनी वित्त पुरवठा करावा. बांबू लागवड ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून बांबू पासून अनेक वस्तू तयार करता येतात. वस्तू बनविण्याची प्रशिक्षण सत्रे विविध गावांमध्ये सुरू करावीत.

केरळ राज्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटकांसाठी होम स्टेची सुविधा तयार करण्यात येणार आहे. कांदाटी खोऱ्यातील नागरिकांशी संपर्क साधून या विषयी प्रशिक्षणही देण्यात यावे, असेही ते म्हणाले. बँकांकडे प्रलंबित असलेल्या विविध महामंडळांकडील वित्तीय लाभाच्या प्रकरणांचा १५ दिवसांत निपटारा करावा, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com