Urban Issues: शहरातील नागरी समस्यांकडे मनपाने गंभीरपणे द्यावे लक्ष

Civic Problems: शहरातील वेगवेगळ्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त मानसी यांच्याकडे करण्यात आली आहे.
Urban Issues
Urban IssuesAgrowon
Published on
Updated on

Latur News:  शहरातील वेगवेगळ्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त मानसी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

सध्या शहरात रस्ते फोडून भूमिगत पाइपलाइन टाकली जात आहे, हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागत आहेत, कचऱ्याचा प्रश्न निकाली काढावा, शहरातील सुलभ स्वच्छतागृहांत महिलांना शुल्क आकारू नये, महिलांसाठी ही मोफत सुविधा असावी. शहरात सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे.

Urban Issues
Urban Farming: घरच्या घरी उगवा अन्न! शहरी शेतीची सुरुवात आजच करा!

त्यामुळे प्रत्येक प्रभागात धूर फवारणी करावी, शहरात फुटपाथवरच अतिक्रमण करून व्यवसाय थाटले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी फुटपाथ रिकामे करावेत, शहरात उघड्यावरील मांस विक्री बंद करावी, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, शहरात पार्किंगची व्यवस्था करावी, आवास योजनेतील अनुदानाचे हप्ते लाभार्थ्यांना

Urban Issues
Urban Development: राज्यातील १९७६ पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त गावठाणांसाठी नागरी सुविधा मिळणार!

वेळेवर देण्यात यावेत, आदी मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात सहसंपर्क प्रमुख नामदेव चाळक, चंद्रनाथ मुरळीकर, जिल्हाप्रमुख अजित रेड्डी, महिला जिल्हा संघटक सुनिता नामदेव चाळक, उपजिल्हा प्रमुख बालाजी जाधव, महानगर प्रमुख सुनील बसपुरे,  शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक त्र्यंबक गुरुनाथ स्वामी,

एस.आर.चव्हाण, लातूर शहरप्रमुख विष्णुपंत साठे, अॅड. राहुल मातोळकर, योगेश स्वामी, शंकर रांजणकर, माधव कलमुकले, सुभाष गुंडिले, किसन समुद्रे, बसवराज मंगरूळे, अॅड. वैभव बिराजदार, संध्या आरदवाड, शेख रफीक, राजाभाऊ घटमल, हनुमंत पडवळ आदी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com