Urban Development: राज्यातील १९७६ पूर्वीच्या प्रकल्पग्रस्त गावठाणांसाठी नागरी सुविधा मिळणार!

Maharashtra Cabinet Decision: राज्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पग्रस्त ३३२ गावठाणांना नागरी सुविधांचा लाभ मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने यासाठी तब्बल ५९९ कोटी ७५ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी दिली आहे.
Mantralaya
MantralayaAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील विविध जिल्ह्यांतील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या ३३२ गावठाणांमध्ये अपूर्ण राहिलेल्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कामांसाठी ५९९ कोटी, ७५ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.

Mantralaya
Government Decision : ‘ॲग्रिस्टॅक’ची कामे करण्यास कृषी सहाय्यकांचा नकार

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना भूसंपादन मोबदला देणे, नवीन गावठाणातील भूखंड देणे, पुनर्वसित गावठाणात नागरी सुविधा पुरविणे, लाभक्षेत्रातील पर्यायी जमीन देणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. पुनर्वसनासाठी प्रकल्प यंत्रणेच्या निधीतून खर्च केला जातो. पाटबंधारे प्रकल्पांच्या बाबतीत जलसंपदा प्रकल्प संस्था आहे.

Mantralaya
Maharashtra Cabinet Decision: वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरास वर्षाची मुदतवाढ

मात्र १९९८ मध्ये शासनाने विविध विभागांत पाटबंधारे विकास महामंडळे स्थापन केली आहेत. त्यामुळे जुन्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी महामंडळाकडून निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे जुन्या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या गावांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी महसूल व वन विभागाच्या पुनर्वसन प्रभागांकडे निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार ३३२ गावठाणातील अपूर्ण नागरी सुविधा पुरविण्यासाठी ४२४ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीबाबतचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागामार्फत हाताळण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली. हा निधी आणि पूर्वीची १७५ कोटी, १४ लाख रुपयांची थकबाकी असे एकूण ५९९ कोटी, ७५ लाख रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपलब्ध करून देण्यासही मंजुरी देण्यात आली. या नागरी सुविधांचे कामे पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीसाठी ग्राम विकास विभागाकडे हस्तांतर करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com