APMC Market Scam : बाजार समिती शौचालय घोटाळ्याप्रकरणी संजय पानसरेंना अटक ; सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

APMC Toilet Scam : नवी मुंबई बाजर समितीतील शौचालय घोटळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने कारावाई केली आहे. या प्रकरणी बाजर समितीच्या फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे.
APMC Market
APMC MarketAgrowon

Pune News : नवी मुंबई बाजर समितीतील शौचालय घोटळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने कारावाई केली आहे. या प्रकरणी बाजर समितीच्या फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे.

पानसरे यांच्यासह सात जणांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सातरा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी बाजार समितीमध्ये नियमबाह्य पध्दतीने शौचालयाच्या निविदा दिल्याप्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. बाजर समितीच्या नियमाप्रमाणे निविदा प्रक्रिया न करता आपल्या मर्जीतील संस्थांना शौचालयाची निविदा दिल्याचा आरोप पानसरे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात सात कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

APMC Market
Mumbai APMC Scam : ‘एफएसआय’ घोटाळ्या प्रकरणी फौजदारीचे आदेश

दरम्यान, गुन्हे शाखेने पानसरे यांना बुधवारी (ता. २४) चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीअंती त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पानसरे यांच्यासह गुन्हे शाखेने अन्य सात संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल

शशिकांत शिंदे

रविंद्र पाटील

सीताराम कावरखे

जी.एम. वाकडे

विजय शिंगाडे

सुदर्शन भोजनकर

राजेंद्र झुंझारराव

विलास पवार

यापैकी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून इतरांचा जामीन फेटाळला आहे.

APMC Market
Mumbai APMC Scam : एक चौरस फूटही एफएसआय वापरलेला नाही

गाळे विक्रीत चार हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

वाशी बाजार समितीतील एक हजार स्केअर फुटाचे गाळे अवघ्या पाच लाख रुपयांना विक्री करून चार हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर केला आहे. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे. यावेळी शिंदे यांनी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या आदेशाची कागदपत्रेही त्यांनी दाखवली.

दरम्यान, महेश शिंदे यांच्या आरोपांना उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीने मला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. जनतेकडून मला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. यामध्ये जर मी दोषी आढळलो, तर मी माझा लोकसभेचा अर्ज भरणार नाही, अशा शब्दात शशिकांत शिंदे यांनी आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com