Dam Water Discharge : ‘मुळा’तून तीन हजार क्युसेकने विसर्ग

Mula Dam Water Level : यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर पाऊस सुरू झाला. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणांतून अधिक पाणी जमा झाले.
Mula Dam
Mula Dam Agrowon
Published on
Updated on

Ahilynagar News : मुळा धरणाचा पाणीसाठा ७०.०३ टक्के (सव्वा अठरा टीएमसी) झाला आहे. मात्र धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार १५ जुलैपर्यंत ५५ टक्के (१४,३०५ दशलक्ष घनफूट एवढा नियंत्रित ठेवण्यात येणार असल्याने मुळा धरणातून बुधवारपासून (ता. ९) मुळा नदीत ३ हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.

दरम्यान, पश्‍चिम भागातील पावसाचा जोर कमी झाल्याने भंडारदरा, निळवंडे धरणांतूनही विसर्ग कमी केला आहे. जिल्ह्यात २६ टीएमसी क्षमतेचे मुळा धरण हे सर्वात मोठे धरण आहे. हरिचंद्रगड परिसरातील पडणाऱ्या पावसावर हे धरण भरते. यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर पाऊस सुरू झाला. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणांतून अधिक पाणी जमा झाले. हरिचंद्रगड परिसरातही जोरदार पाऊस पडल्याने मुळा धरणाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली.

Mula Dam
Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता लहित खुर्द (कोतूळ) येथील सरिता मापन केंद्रापासून मुळा नदीपात्राद्वारे ४००० क्युसेकने, तर गुरुवारी सकाळी ५ हजार ३२७ क्युसेकने धरणाच्या दिशेने नवीन पाण्याची आवक सुरू होती. मुळा धरणाचा पाणीसाठा १८,२०७ दशलक्ष घनफूट (७०.०३ टक्के) झाला आहे.

Mula Dam
Dam Water Release : नाशिक जिल्ह्यात पाच धरणांतून विसर्ग सुरू

मुळा धरण जलाशय परिचालन सूचीनुसार सध्याचा साठा स्थिर ठेवून अतिरिक्त पाणी अप्पर गाइड कर्व्हनुसार धरणातून नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून ३००० क्युसेकने सर्व ११ वक्री दरवाजाद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. धरणात नवीन पाण्याची आवक कमी जास्त होईल, त्याप्रमाणे धरणातून नदीपात्रातील विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे.

मुळा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रातील चीज वस्तू, शेती अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवावेत. नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये. जीवित व वित्त हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी. १५ जुलैपर्यंत पाणीसाठा स्थिर ठेवून १६ जुलै रोजी धरणाचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात येतील.

Mula Dam
Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

१६ ते ३१ जुलै दरम्यान धरणसाठा २१,८०९ दशलक्ष घनफूट (८३.९१ टक्के) करण्यात येईल. तो धरणसाठा झाल्यावर पुन्हा धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पुराचे पाणी नदीपात्रात सोडले जाईल, असेही कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान, दिवसापासून पाणलोटात पावसाचा जोर कमी झाल्याने भंडारदरा धरणातून विसर्ग कमी केला आहे. गुरुवारी (ता. १०) ३३४८ क्युसेकने, तर निळवंडे धरणातून ६ हजार २९६ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू होता. घाटघरला २४ तासांत ३६ मिलिमीटर, रतनवाडीला ४९ मिलिमीटर, भंडारदरा येथे ४० मिलिमीटर, निळवंडे येथे २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com