Dam Water Release : नाशिक जिल्ह्यात पाच धरणांतून विसर्ग सुरू

Nashik Water Stock : नाशिक शहर व परिसरात पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.
Dam Water Release
Dam Water ReleaseAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी (ता. ३) जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. मात्र पश्चिम पट्ट्यात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची जोरदार होती. त्यामुळे दारणा व गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे. तर भावली व भोजापूर धरण तुडुंब भरले आहे.

नाशिक शहर व परिसरात पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. इगतपुरी तालुक्यात इगतपुरी, घोटी,धारगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला.

Dam Water Release
Water Storage : धाराशिवमध्ये प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ

संततधार पावसामुळे भावली धरण मागील वर्षापेक्षा दोन आठवडे आधीच भरले आहे.जिल्ह्यातील पहिलेच भावली धरणातून गुरुवार (ता.३) रोजी दुपारी चार पासून धरणातून पाणी ओसंडून वाहू लागले.

दारणा नदीच्या उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असणारे भावली धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले.दरम्यान तालुक्यात अधून मधून बरसणाऱ्या पावसाने चार दिवसांपासून चांगलाच जोर धरल्याने इतर धरणाच्या साठ्यात ही भरीव वाढ झाली आहे.

Dam Water Release
Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

पावसामुळे तालुक्यातील भावली, भाम,मुकणे,वैतरणा,दारणा,कडवा व वाकी या धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील त्र्यंबकेश्वर,वेळुंजे,हरसूल, ठाणापाडा महसूल मंडळात पावसाचा जोर होता.याचदरम्यान, ब्रह्मगिरी पर्वतावर सायंकाळच्या सुमारास एक व्यक्ती पडल्याचे निदर्शनास आले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती मिळताच शोध व बचाव पथक त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार असल्यामुळे जलसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे सध्या गंगापूर,दारणा यांच्यासह ५ धरणांतून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरणातील विसर्ग

दारणा ः ५,१६२, गंगापूर ः ३,७१६,

पालखेड ः ६७८, भावली ः ४८१,

भोजापूर ः३८, नांदूरमध्यमेश्वर ः १२,६२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com