मध्य प्रदेशात पोषण आहारात मुगाच्या डाळीचा समावेश

मुख्यमंत्री चौहान यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मूग डाळीचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पोषण आहारात मूग डाळ वाटण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वर्षाकाठी प्रत्येकी १० ते १५ किलो मूग डाळ देण्यात येणार आहे.
Muga pulses are included in the nutritional diet in Madhya Pradesh
Muga pulses are included in the nutritional diet in Madhya PradeshAgrowon
Published on
Updated on

मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांना आता पोषण आहार म्हणून सरकारतर्फे मुगाची डाळही दिली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री चौहान यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मूग डाळीचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पोषण आहारात मूग डाळ वाटण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वर्षाकाठी प्रत्येकी १० ते १५ किलो मूग डाळ देण्यात येणार आहे.

Muga pulses are included in the nutritional diet in Madhya Pradesh
जुलैपर्यंत ३५ लाख टन गहू निर्यातीचे करार

येत्या १५ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुलांच्या आहारात पोषक घटकांचा समावेश असायला हवा, या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

कटनी येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १५ एप्रिलपासून इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाकाठी १० किलो आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षाला १५ किलो डाळ देण्यात येणार असल्याचे चौहान म्हणाले आहेत.

Muga pulses are included in the nutritional diet in Madhya Pradesh
रेशनकार्ड धारकांना मिळणार फोर्टिफाईड तांदूळ

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत सप्टेंबर २०२२ पर्यंत ज्याप्रमाणे प्रती व्यक्ती दरमहा ५ किलो रेशन दिले जाते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो रेशन दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दर महिन्याच्या ७ तारखेला अन्नोत्सव कर पात्र योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याचे रेशन दिले जाते. या रेशन वितरणापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही चौहान यांनी प्रशासनाला केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com