ST Smart Card : एसटीचे स्मार्ट कार्ड आगारात धूळ खात

MSRTC Update : ज्येष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे एसटीची सवलत मिळते.
ST Bus
ST BusAgrowon
Published on
Updated on

Raigad News : एसटी महामंडळाने कागदी ओळखपत्राच्या जागी प्रवाशांना स्मार्ट कार्ड देण्याची योजना सुरू केली होती, परंतु ही योजना बारगळी असून, तयार केलेले असंख्य स्मार्ट कार्ड रायगड जिल्ह्यातील एसटी बस आगारातील आरक्षण कक्षात धूळखात आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे एसटीची सवलत मिळते. त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एसटीची सवलत दिली जाते. तसेच नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह सात दिवस, १४ दिवस कुठेही प्रवास योजनेसाठीदेखील एसटीचे पास मिळतात.

ST Bus
ST Bus : एसटीचे थेट लोकेशन आता घरबसल्या कळणार

मात्र लाभार्थ्‍यांना मिळणारे सवलत पास हे कागदी स्वरूपात असल्यामुळे पावसाळ्यात भिजून खराब होण्याबरोबरच गहाळ होण्याची भीती असल्‍याने नऊ वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. मात्र दोन वर्षांपासून कंपनीला खर्च परवडत नसल्याने त्यांनी काम थांबविल्याचे सांगण्यात येत आहे.

ST Bus
ST Bus : लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी आता लालपरीत सीसीटीव्ही

नूतनीकरण रखडले

२०१६ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू झाली. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व अन्य पासधारकांचे ‘स्मार्ट’ ओळखपत्र बनले. ते ओळखपत्र स्कॅन केल्यावर मशीनमध्ये नोंदणी केली जात होती. ज्या कंपनीला स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम दिले होते, त्याच कंपनीने तांत्रिक बिघाड असल्याचे कारण दिले आहे. सर्व्हरची समस्या असल्‍याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना नव्याने स्मार्ट कार्ड काढण्यापासून मुदत संपलेल्या स्मार्ट कार्डचे नूतनीकरणही रखडले आहे.

आधार कार्डद्वारे एसटी सवलत

स्मार्ट कार्ड योजना सरकारची असून, दोन वर्षांपासून बंद झाली आहे. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डद्वारे एसटीतून प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. सध्या जुन्याच पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना असल्‍याचे एसटी महामंडळाचे रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com