Supriya Sule : दूध दरावरून सुप्रिया सुळे भडकल्या; म्हणाल्या, "दूध दर सात दिवसात पुर्ववत करा अन्यथा रस्त्यावर उतरू"

Supriya Sule On Milk Rate : राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असून पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्‍न, पशुखाद्याचे वाढते दराने मेटाकुटीला आला आहे. यातच खाजगी दूध संघांनी दूधाच्या दरात १ रुपयांची कपात केली आहे.
Supriya Sule
Supriya Sule Agrowon

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांची नेसर्गिक आपत्तींसह सरकाने मदत न केल्याने पुरती कोंडी झाली आहे. यादरम्यान बुडत्याला काडीचा आधार देणाऱ्या दूधाच्या दरात देखील खासगी दूध संघांनी १ रुपयांची कपात केली. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच शासनाने दूध दरावरून लवकर तोडगा न काढल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराही सुळे यांनी दिला आहे.

राज्यात यंदा वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे दुधाच्या दरात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. तर दुष्काळामुळे जनावऱ्यांच्या चारा पाण्याची समस्या निर्माण झाली. चाऱ्याचे दर वाढले असतानाच पशुखाद्याचे दर देखील भडकले आहेत. सध्या राज्यातील शेतकरी चोहो बाजूंनी मेटाकुटीला आला आहे. यादरम्यान हम करे सो कायदा म्हणत खाजगी दूध संघांनी दूध दरात प्रतिलीटर १ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे अधीच अडचणीत सापडलेला दूध उत्पादक आणखीच अडचणीत आला आहे.

Supriya Sule
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची शेतकरी आणि हिंजवडी आयटी पार्कवरून सरकारवर सडकून टीका

यावरून खासदार सुळे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. त्यात आता पुन्हा एकदा दूधाच्या दरात घट झाल्यामुळे भरीस भर पडल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दूधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार होता. मात्र यात देखील आता कपात करण्यात आली आहे. पशुखाद्य, चारा यांचे दर अतिशय वाढलेले असून दूधाच्या कमी झालेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दूधाचे दर पुर्ववत करण्याच्या दृष्टीने सात दिवसांच्या आत पावले उचलावी, अशी विनंती सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule
Milk rate : खाजगी संघाकडून दूध दरात प्रतिलीटर १ रुपयांची कपात; दूध उत्पादक हवालदिल

तर सात दिवसांच्या आत शासनाने दूधाच्या दराबाबत काही ठोस पावले उचलली नाहीत. तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशाराही सुळे यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान खाजगी दूध संघानी मनमानी कारभार चालवला आहे. यास पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी वेसण घालावी अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

तर दूध दरात केलेल्या कपातीवरून नवले म्हणाले, खाजगी दूध संघानी दूधाच्या दरात १ रूपयांची केलेली कपात ही संगनमताने केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा दूधाच्या दरात घसरण झाली आहे. राज्य सरकारने ३४ रुपये प्रतिलीटर दर निश्चित केले असतानाही दूधाचे दर प्रतिलिटर २५ रूपयांवर आले आहेत. याप्रकरणी पशूसंवर्धन मंत्र्यांनी लक्ष घालावे. अन्यथा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह किसान सभेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही नवले यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com