Shrikant Shinde : 'मुख्यमंत्री शिंदे दोन दिवस गावी असताना अफवांना पेव फुटला'; मंत्रिपदाच्या शर्यतीवरून श्रीकांत शिंदेंनी अखेर मौन सोडले

Maharashtra Politics News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ९ लोटले आहेत. अजूनही सत्तास्थापनेचा दिवस उजाडलेला नाही किंवा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आलेला नाही.
Shrikant Shinde
Shrikant ShindeAgrowon
Published on
Updated on

Pune News : महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री पदासह उपमुख्यमंत्री पद मिळाले म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याच्या चर्चा आहेत. तर एकनाथ शिंदे केंद्रात मंत्रिपदी आणि उपमुख्यपदावर खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागेल असेही बोलले जात होते. यावरून श्रीकांत शिंदे यांनी समाजमाध्यम एक्सवरून, आपल्याला आधीच केंद्रात संधी होती. मात्र ती आपण घेतली नाही. तर आताही उपमुख्यमंत्रीपद असो किंवा मंत्रिपदाची शर्यत यात आपण नसल्याचे म्हटले आहे. यामुळे नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे देखील नसणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता ९ दिवस झाले आहेत. अद्याप मुख्यमंत्री कोण यावर महायुतीत निर्णय झालेला नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. तर नव्या सरकारचा शपथविधी गुरूवारी (ता.५) होणार असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Shrikant Shinde
Eknath Shinde : 'तब्बेत ठिक हाय, पण मी माझा निर्णय घेतलायं'; एकनाथ शिंदे यांनी आपली भूमीका स्पष्ट केली

दिल्लीतल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले. तेथेच त्यांची तब्बेल बिघडल्याने ते दोन दिवस राहिले. यानंतर रविवारी ते ठाण्यात परतले. आता सोमवारी देखील त्यांची तब्बेत बिघडल्याने बैठका आणि सर्व कार्यक्रम रद्द रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदावरून आपली भूमीका स्पष्ट करणारी पोष्ट केली आहे. ज्यात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाची चर्चा सुरू असून या फक्त अफवा आहेत. यात काहीही नाही. लोकसभा निवडणुकीनंतरच केंद्रात मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेचा विचार करून आपण ती संधी सोडल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

Shrikant Shinde
Mahayuti Government : राज्यात नवे सरकार येणार ५ डिसेंबरला; मुख्यमंत्र्याचे नाव अजूनही गुलदस्त्यातच

तर महायुती सरकारचा शपथविधी थोडा लांबला. आता त्यावरून चर्चा आणि अफवा पसरवल्या जात आहेत. गेल्या दोन दिवसापासून अफवांचे पीक फोफावले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे याला अधिकच बहर आला.

तर माझे नाव घेऊन उपमुख्यमंत्री मीच होणार अशा बातम्या पेरल्या गेल्या. पण वस्तूतः यात कोणतेही तथ्य नाही. उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या अशा सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. मंत्रिपदाची कुठलीही लालसा नसून आपण कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com