
Pune News : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा तिढा अद्याप सुटलेला नसून ५ डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. याबाबतची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटरवरून दिली. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थान चे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, हरियाणा चे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतरही एका आठवड्यात राज्याचा मुख्यमंत्री कोण? यावर शिक्कामोर्तब झाला नव्हता. दरम्यान बावनकुळे यांनी नव्या मंत्रिमंडळाचा शपथ विधी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री पदाचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून शपथविधीआधी भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक होणार आहे. यासाठी भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार आहेत.
दरम्यान या सोहळ्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली असून भाजपच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना बानवकुळे यांनी दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील, असेही बानवकुळे यांनी म्हटले आहे. तसेच बानवकुळे यांनी शपथविधी वेळी आपापल्या जिल्ह्यात जल्लोष करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि इतर राज्याचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव १५ ते १६ हजार विशेष पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पास असणाऱ्याच व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार आहे.
फडणवीस मुख्यमंत्री?
दरम्यान राज्यात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले असून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकट्या भाजपचे १३२ आमदार निवडून आल्याने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे बोलले जात होते. तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच असतील अशीही चर्चा सुरू झाली होती. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांमुळे काही मागण्यांमुळे शपथविधी रखडला होता.
पण आता त्यांच्या मागण्या भाजपने मान्य केल्या असाव्यात. यानंतरच ५ डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला असावा, असेही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.