Orange Farming: काटेकोर व्यवस्थापनातून संत्रा फळांचा दर्जा राखण्यावर भर

Orange Production: मनोज टावरी यांची २५ एकर संत्रा लागवड आहे. त्यापैकी १३ एकर क्षेत्रावर त्यांनी आंबिया बहर धरला आहे. सध्या आंबिया बहरातील बागेतून फळ काढणी पूर्ण झाली आहे.
Orange Farming
Orange FarmingAgrowon
Published on
Updated on

Orange Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : संत्रा

शेतकरी : मनोज टावरी

गाव : बेनोडा (शहीद), ता. वरुड, अमरावती

संत्रा क्षेत्र : २५ एकर

एकूण झाडे : ३८६६ संत्रा झाडे

मनोज टावरी यांची २५ एकर संत्रा लागवड आहे. त्यापैकी १३ एकर क्षेत्रावर त्यांनी आंबिया बहर धरला आहे. सध्या आंबिया बहरातील बागेतून फळ काढणी पूर्ण झाली आहे. दर्जेदार फळ उत्पादनासाठी त्यांनी काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापनासह कीड-रोग नियंत्रणावर भर दिला आहे. त्यांनी सुमारे २५ एकरांत टप्प्याटप्प्याने संत्रा झाडांची लागवड केली आहे.

संत्रा लागवड

मनोज टावरी यांची सुमारे २५ एकरांत संत्रा बाग विस्तारली आहे. संपूर्ण क्षेत्रावरील लागवड टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे. २००५ मध्ये त्यांनी एका क्षेत्रातील १३ एकरांवर सुमारे २८०० झाडे, तर दुसऱ्या क्षेत्रात अडीच एकरांवर ४५० झाडांची साडेसोळा बाय साडेसोळा फूट अंतरावर लागवड केली आहे. त्यानंतर २०१४ मध्ये साडेपाच एकरांवर ८०० झाडांची १७ बाय १७ फुटांवर, तर २०२१ मध्ये ३ एकरांत ४१६ झाडांची १८ बाय १८ फूट अंतरावर लागवड केली आहे.

संत्रा लागवडीत प्रामुख्याने हस्त आणि आंबिया बहराच्या फळांचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आंबिया बहर धरल्यानंतर झाडांवर फूट कमी प्रमाणात आढळून आल्यास त्याच झाडांवर मृग बहराचे नियोजन केले जाते. शास्त्रोक्‍त व्यवस्थापनातून फळांचा दर्जा राखण्यावर भर दिला जातो.

Orange Farming
Orange Farming : सिंचन, अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर

बागेतील प्रत्येक फांदीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे अत्यंत आवश्यक असते. यातून प्रकाश संश्लेषणाची क्रिया योग्य प्रकारे होते. संत्रा बागेत झाडाच्या मध्यभागी असलेल्या फांद्यांना अपेक्षित सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यासाठी झाडांच्या वरील बाजू असलेल्या फांद्यांची छाटणी करण्यावर भर दिला जातो, असेही मनोज टावरी सांगतात.

ड्रेचिंगवर अधिक भर

बागेतील झाडांवर फायटोप्थोराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी सुडोमोनस आणि ट्रायकोडर्मा यांचे ड्रेचिंग केले जाते. मॉन्सून काळात सात ते आठ इंच पाणी झाल्यावर आणि ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा ड्रेचींग केले जाते. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहावा याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून ड्रेचिंग करण्यावर अधिक भर दिला जातो.

सिंचन व्यवस्थापन

संत्रा लागवडीत सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाते. पाटपाणी तसेच ठिबक सिंचन पद्धती अशा दोन्ही पद्धतीने सिंचन करण्याचे नियोजन असते. सिंचनासाठी बोअरवेल आणि विहिरीचा पर्याय आहे.

पाटपाणी देताना झाडांभोवती आळे तयार केले जाते. त्यानंतर पाटपाणी दिले जाते. तसेच ठिबकचा पर्याय देखील आहे. मॉन्सून काळात पावसातील खंड, तापमान, जमिनीतील उपलब्ध ओलावा, झाडाची पाण्याची गरज आदी

बाबींचा विचार करून सिंचनाचे नियोजन केले जाते. ठिबकद्वारे विद्राव्य खते देण्याचे नियोजन असते.

मागील कामकाज

फळांचा दर्जा राखण्यासाठी तसेच फळगळ टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार रासायनिक फवारण्यांचे नियोजन करण्यात आले.

फळमाशीमुळे संत्रा फळांचा दर्जा खालावतो. त्यासाठी बागेत सापळे लावण्यात आले.

थंडीच्या काळात बागेत कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढीस लागतो. त्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी घेण्यात आली.

Orange Farming
Orange Harvesting : वाशीमला संत्र्याच्या मृग बहर तोडणीस प्रारंभ

आवश्यकतेनुसार बागेत पाटपाणी पद्धतीने सिंचन करण्यावर भर देण्यात आला.

साधारणपणे ११ डिसेंबरच्या दरम्यान संत्रा फळांच्या काढणीस सुरुवात करण्यात आली. साधारण १० दिवसांत संत्रा फळांची काढणी पूर्ण झाली. उत्पादित फळांची जागेवरून विक्री करण्यात आली.

एकरी ४ टन प्रमाणे फळांचे उत्पादन मिळाले आहे. फळांचा दर्जा उत्तम राखण्यावर भर दिल्यामुळे दर्जेदार उत्पादन मिळाले आहे.

आगामी कामकाज

सध्या बागेतील फळकाढणी पूर्ण झाली असून बागेत स्वच्छतेच्या कामांवर भर दिला जात आहे.

तण नियंत्रणासाठी बागेत तणनाशकांची फवारणी करण्यावर भर दिला जाईल.

वाळलेल्या फांद्याची छाटणी केली जाईल. त्यानंतर बोर्डोची फवारणी करण्यात येईल.

या पुढील काळात बागेस विश्रांती दिली जाईल.

बहर व्यवस्थापन

बहर धरतेवेळी प्रति झाड चार टोपली या प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत देण्यावर भर राहतो. एक वर्षाआड शेणखताची मात्रा दिली जाते. मागील वर्षी मे महिन्यात सिंगल सुपर फॉस्फेट देण्यात सातत्य ठेवले होते.

जून महिन्यात पहिले पाणी दिल्यानंतर डीएपी किंवा १०ः२६ः२६ यापैकी एका खताची प्रति झाड मात्रा दिली जाते.

नवती फुटण्यास सुरुवात झाल्यानंतर बोरॉन आणि झिंकची मात्रा दिली जाते. त्या सोबतच एखादे रासायनिक कीटकनाशक देण्यावर भर राहतो.

त्या पुढील टप्प्यात सिट्रस सायला तसेच अन्य किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणखी एक रासायनिक कीटकनाशक फवारणी घेतली जाते. कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेतील झाडांचे सातत्याने निरिक्षण केले जाते. आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाते.

दर ८ ते १० दिवसांनी पाटपाणी दिले जाते. बागेतील वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन आळे पद्धतीने सिंचन केले जाते.

फुलधारणा झाल्यापासून ते लहान आकाराची फळधारणा होईपर्यंत नियमितपणे सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला. सुरुवातीच्या काळात दर १५ दिवसांनी, तर त्यापुढील काळात १ महिन्याच्या अंतराने मात्रा देण्यात आली.

मनोज टावरी ८३९०१ ५७८३८

(शब्दांकन : विनोद इंगोले)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com