Amol Kolhe : शरद पवारांच्या भेटीनंतर कोल्हे यांचा हुंकार; आक्रोश मार्चा काढण्यावर ठाम

Amol Kolhe On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाना साधला होता. तसेच त्यांना पाडणार म्हणजे पाडणार असे म्हटलं होते. त्यानंतर कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
MP Amol Kolhe
MP Amol KolheAgrowon
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर मंगळवार (२६ रोजी) खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. कोल्हे यांनी पवारांची भेट पुण्यातील मोदीबागेतील कार्यालयात घेतली. त्यानंतर चर्चांना उत आला आहे. यावेळी कोल्हे यांनी बुधवार (२७ रोजी) काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पवारांचं मार्गदर्शन घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

कोल्हे म्हणाले, '२७,२८,२९ आणि ३० असे चार दिवस शेतकरी आक्रोश मोर्चा शिवनेरीच्या पायथ्याशी निघणार आहे. तर शेतकऱ्यांची जी बिकट स्थिती झाली आहे, त्यातील सहा प्रमुख मुद्दे घेऊन हा मोर्चा निघणार असल्याचे', त्यांनी सांगितलं आहे.

'कांदा निर्यात बंदी उठवणे, कांदा निर्यात धोरण आखण्याचीही मागणी करण्यासह दिवसा थ्रीपेज अखंडीत विज पुरवठा व्हावा, पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान योग्य भरपाई मिळत नाही. याबाबत धोरणनिश्चिती व्हावी. दुधाच्या दरात सरसकट शेतकऱ्यांना ५ रू अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज ज्या बँका कर्ज देत नाहीत त्यांच्याबाबत धोरणनिश्चिती व्हावी, अशा मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे', कोल्हे म्हणाले.

MP Amol Kolhe
Sharad Pawar : शेतकरी आक्रोश मोर्चाचा शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप

तर हा आक्रोश मोर्चा जुन्नर येथून सुरू होणार असून तो ओत्तूर, आळेफाटा, नारायणगावं, मंचूर, चाकण करून तो बारामती मतदार संघात प्रवेश करणार आहे. त्यामुळेच पवार यांची भेट घेतल्याचे कोल्हे म्हणाले.

शरद पवारांनी पाहिले शेतकऱ्यांचे हित

सातत्याने शरद पवार यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. ते केंद्रीय कृषीमंत्री असताना कांद्याची निर्यातीवरून भाजपने हल्लाबोल केला होता. तर निर्यात थांबवावी अशी मागणी लावून धरली होती. मात्र पवार यांनी शेतकऱ्यांचे हित पाहत निर्यातबंदी केली नाही.

विराट सभा

या आक्रोश मार्चाचा समारोप शनिवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार असून शरद पवार यांची विराट सभा होणार आहे. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.

MP Amol Kolhe
Sugarcane Harvesting Wages : तोडणी दराचा तिढा शरद पवार सोडविणार

अजित पवार यांची चर्चा नाही

दरम्यान सोमवारी (२५ रोजी) अजित पवार यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांच्या विरोधात युतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणू असे म्हटलं होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे याच कारणासाठी ते पवार यांच्याकडे गेले असावेत अशी चर्चा होत आहे.

यावरून कोल्हे यांनी, 'शरद पवार आणि त्यांच्यात अजित पवार यांनी केलेल्या टीकेची कोणतीच चर्चा झाली नाही असे म्हटलं आहे. तसेच, 'अजित पवार हे मोठे नेते आहेत. मी आहे तेथेच आहे. त्यांना कान धरण्याचा अधिकार आहे त्यांनी तेंव्हाच धरला असता. ते सोपं झालं असतं, असे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com