Organic Fertilizer : सेंद्रिय खतातून समृद्धीकडे वाटचाल

Organic Farming : दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून बी- बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही.
Organic Fertilizer
Organic Fertilizer
Published on
Updated on

Wangaon News : दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून बी- बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही.

अनेकदा उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. रासायनिक खतांवर होणारा खर्च हा जास्त असतो, त्याला पर्याय म्हणून डहाणूतील आगर येथील चंद्रकांत पाटील यांनी घरच्या घरी सेंद्रीय खत प्रकल्प उभारून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

जीवामृत हे एक जैव कीटकनाशक आणि सेंद्रीय खत आहे. जीवामृत हे देशी गाईचे शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ, माती आणि पाणी एकत्र मिसळून तयार केले जाते. जीवामृत हे नैसर्गिक कार्बन बायोमास, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि पिकांसाठी आवश्यक असलेल्या इतर सूक्ष्म पोषक घटकांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. जीवामृत हे पीक आणि माती या दोघांसाठी फायदेशीर आहे.

Organic Fertilizer
Organic Farming : सेंद्रिय शेती प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश

गुणधर्म

चांगल्या जीवामृताचा रंग तांबडा ते काळसर असतो.

नत्राचे प्रमाण तीन ते सहा टक्क्यांपर्यंत असते.

उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंच्या निरनिराळ्या प्रजातींच्या वाढीसाठी जीवामृत हे उत्कृष्ट अन्नस्त्रोत ठरते.

सूक्ष्म जिवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. त्यातील कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर कमी होते.

फायदे

मातीतील सूक्ष्म जीवांची संख्या आणि अनुकूल जिवाणू वाढविण्यासाठी एजंट म्हणून कार्य करते.

जीवामृत सात दिवसांत बनवता येते. त्यामुळे ते प्रभावीपणे आणि वारंवार वापरले जाऊ शकते.

जमिनीत गांडुळांची संख्या वाढते. त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.

Organic Fertilizer
Organic Farming : सेंद्रिय शेतीमुळे शेतकरी, ग्राहक दोघांनाही लाभ

जीवामृत कसे तयार करावे?

जीवामृत करण्यासाठी २०० लिटर क्षमतेचे बॅरल किंवा टाकीमध्ये २०० लिटर स्वच्छ पाणी घ्यावे. त्यात देशी गाईचे १० किलो शेण, पाच लिटर गोमूत्र, दोन किलो काळा गूळ, दोन किलो बेसन, एक किलो जिवाणू माती मिसळावे. डावीकडून उजवीकडे दररोज दहा ते पंधरा मिनिटे दोन ते तीनवेळा ढवळावे. सात दिवसांत पिकांना देण्यासाठी जीवामृत तयार होते. एका एकराला २०० लिटर जीवामृत पुरेसे होते. लाखो लिटर जीवामृत घरीच बनवता येते.

वापर कसा करावा?

सामान्यपणे शेतकरी जमिनीच्या बुंध्यापासून दोन ते तीन फुटांवर खते किंवा आळवणी करतात, परंतु झाडाची मुळे ही झाडाच्या विस्तारापर्यंत पसरलेली असतात. झाडाच्या विस्ताराच्या फांदीचे शेवटचे टोक ज्या ठिकाणी असेल, त्याच्याबरोबर खाली जमिनीत चर खोदून त्यामध्ये जीवामृत सोडावे. शेतामध्ये जीवामृताची फवारणीदेखील करता येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com