Organic Farming : सेंद्रिय शेतीमुळे शेतकरी, ग्राहक दोघांनाही लाभ

Organic Crop Variety : सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सकस व पौष्टिक वाण ग्राहकांना पुरविल्यास शेतकरी व ग्राहक या दोघांनाही लाभ होईल.
Organic Farmign
Organic FarmignAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सकस व पौष्टिक वाण ग्राहकांना पुरविल्यास शेतकरी व ग्राहक या दोघांनाही लाभ होईल. या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण बदलण्यास निश्चित मदत होईल, अशा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कृषी विभागाच्या कृषी, तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स महोत्सव प्रारंभप्रसंगी पाटील बोलत होते.

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष नीलेश हेलोंडे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्पाचे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे, प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के, वलगावचे सरपंच सुधीर उगले, बाळासाहेब यादव या वेळी उपस्थित होते.

Organic Farmign
Organic Farming : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करावा

श्री. पाटील म्हणाले, की नव्या पिढीला मिलेट्स व रानभाज्यांची ओळख करून देणारा हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. हा महोत्सव मर्यादित कालावधीसाठी न ठेवता शहरातील नागरिकांना सहज उपलब्ध होईल, अशी बाजारपेठ निर्माण करावी. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन नागरिकांना आरोग्यवर्धक भाज्या व फळे सहज उपलब्ध होईल.

मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीला प्राध्यान्य देऊन उत्पादित शेती मालाला ‘मेळघाट हाट’च्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे.

Organic Farmign
Group Framing : ...तर ‘गट शेती’च्या तक्रारीला जेडीए, एसएओ जबाबदार

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रानभाजी व मिलेट्सची माहिती असलेली ‘ओळख रानभाज्यांची’ या घडीपत्रिका व संत्रा फळपिकांची संपूर्ण माहिती असलेले ‘संत्रा उत्पादनाचे गुरुकिल्ली’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट्स’ महोत्सवाच्या आयोजन उद्देशाबाबत आत्माच्या प्रकल्प संचालिका अर्चना निस्ताने यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ नीलेश राठोड यांनी आभार मानले.

महोत्सवात मिलेट्स, पाककृती व रानभाज्यांचा समावेश

रानभाजी महोत्सवात मेळघाटसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बचत गट, शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉलवर नैसर्गिकरित्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, करटुले, शतावरी, भुई आवळा, सुरण, अरबी, कमळकाकडी, कपाळफोडी, उंबर आदी ६५ प्रकारचे रानभाज्यांसमवेत कडधान्याचे ३० पेक्षा जास्त प्रकार होते. तसेच बांबूपासून बनविलेले १६ प्रकारचे विविध साहित्यही या महोत्सवामध्ये ठेवण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com