Aslam Abdul Shanedivan
सध्या कमी वयातच केस पांढरे होण्यासह केसात कोंडा, केस गळती आणि टक्कल पडणे अशा समस्यांना अनेकांना तोंड द्यावे लागते.
पांढरे केस लपवण्यासाठी अनेकांचा कल हा हेअर डाय, मेहेंदी किंवा इतर उत्पादनांच्या वापराकडे असतो. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगेल होण्याऐवजी ते खराब होतात.
केसांना पुरेसे पोषण देण्याबरोबरच केस पांढरे होणे, केसात कोंडा, केस गळती आणि टक्कल पडणे यावर घरगुती उपाय करता येतात.
केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी गुळ आणि मेथी दाण्याचे सेवन करावे
गूळ आणि मेथी दाण्याची पावडर एकत्र करून सकाळी उठल्याबरोबर खाल्ल्याने, केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते.
गुळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट यासह इतर पौष्टीक घटक असतात. जे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त ठरतात. गुळामुळे केस मऊ, मजबूत आणि चमकदार होण्यास मदत मिळते.
मेथीमध्ये असणारे प्रोटीन, विटामिन सी असेत. ज्यामुळे पांढरे केस काळे होतात. तसेच मेथीतील लोह स्काल्पवरील ब्लड सर्क्युलेशन सुधारून केसांच्या वाढीसाठी मदत करते.
Sadaphuli : या फुलाच्या पेस्टने चेहऱ्यावरील पुरळ नाहीसे होतील