Mosambi Market : मराठवाड्यातील मोसंबीस दक्षिण कोरियात मागणी

Mosambi Demand in South Korea : जमीन आणि हवामानाच्या अनुकूलतेमुळे दर्जेदार येणाऱ्या मराठवाड्यातील मोसंबी फळपिकास दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Mosambi fruit crop
Mosambi fruit cropAgrowon
Published on
Updated on

Jalna News : जमीन आणि हवामानाच्या अनुकूलतेमुळे दर्जेदार येणाऱ्या मराठवाड्यातील मोसंबी फळपिकास दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दक्षिण कोरियाच्या आयात, निर्यातदारांनी बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रास मंगळवारी (ता. ११) दिलेल्या भेटीवेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून ही माहिती पुढे आली.

या संदर्भात मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी अधिक माहिती दिली. या भेटीवेळी दक्षिण कोरियाच्या मिस कांग कुंग चो, मिस चो योना, मुंबईचे निर्यातदार रवी परब, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी भास्कर पडुळ, वरिष्ठ संशोधक सहायक त्रिवेणी सांगळे आदींची उपस्थिती होती.

Mosambi fruit crop
Mosambi Management : शास्त्रीय व्यवस्थापनानेच मोसंबीमध्ये परिवर्तन शक्य

डॉ. पाटील म्हणाले, की मराठवाड्यातील मोसंबी पिकास त्यांच्याकडे भरपूर मागणी असल्याने त्या पिकाच्या एकूण क्षेत्र, उत्पादकता, त्या पिकाचे उत्पादन तंत्र, फळे उपलब्धतेचा कालावधी, टिकवण क्षमता आदींची शास्त्रीय माहिती घेण्यासाठी ही भेट देण्यात आली. तसेच मराठवाड्यातील मोसंबीच्या फळपिकास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला आहे.

Mosambi fruit crop
Mosambi Orchard : मराठवाड्यातील मोसंबीवर संकटांचे ढग

याची प्रत, चव, दर्जा उत्तम प्रतीचा आहे. त्यामुळे जगभरात या मोसंबीला मागणी आहे. या भेटीत दक्षिण कोरियाच्या आयात, निर्यातदार यांनी मोसंबी फळांच्या विविध गुणधर्माबाबत,आम्ल- साखर, टीएसएस यांच्या गुणोत्तराबाबत शास्रीय माहिती डॉ. पाटील यांच्याकडून जाणून घेतली.

या प्रसंगी प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या विविध मोसंबी, संत्रा, किन्नू आदी वाणांची पाहणी करुन बागेच्या व्यवस्थापनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटी वेळी ज्ञानोबा रणेर, सुरेश गजर, सुरेश पेरकर, पार्वताबाई बलभ आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com