Kunbi Record : छत्रपती संभाजीनगरला हजारावर कुणबी नोंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर तातडीने शासनाने पावले उचलून कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी अशा नोंदी तपासणीचे काम हाती घेतले.
Maratha Reservation
Maratha ReservationAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुमारे १ हजार ६५ कुणबी नोंदींची माहिती अपलोड करण्यात आली असून, बुधवार( ता. ८ ) पासून ही माहिती ऑनलाइन जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर तातडीने शासनाने पावले उचलून कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी अशा नोंदी तपासणीचे काम हाती घेतले. जिल्हा प्रशासनाकडून कुणबी अशा नोंदी असलेल्यांच्या वारसांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली.

Maratha Reservation
Kunbi Record : कुणबी नोंदीचा शोध युद्धपातळीवर करावा

जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर कुणबी मराठा जातीची नोंद असलेली तालुकानिहाय माहिती अपलोड केली आहे. ऑनलाइन माहितीचे दस्त अपलोड करण्याची सतत चालणारी प्रक्रिया आहे. जसेजसे दस्त उपलब्ध होत जातील तसे ते स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड केले जात आहेत.

आतापर्यंत १ हजार ६५ कुणबी नोंदीचे दस्त अपलोड करण्यात आले आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १३७, फुलंब्रीत १३३, कन्नड १२२, खुलताबाद ५३, पैठण २७, सिल्लोड २५, सोयगाव आणि वैजापूर प्रत्येकी २१ तर गंगापूर तालुक्यात ५ दस्त अपलोड करण्यात आले आहेत.

Maratha Reservation
Kunbi Report : कुणबी दाखले देण्यासाठी पुराव्याची तपासणी करावी

‘जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर’ या जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘कुणबी मराठा दस्त नोंदी’ इथे क्लिक केल्यानंतर कुणबी मराठा नोंदी असलेले तालुकानिहाय दस्ताऐवजी बघायला मिळतात. तालुका निवडल्यानंतर तिथे तालुका, गाव, अभिलेख, अभिलेख उपप्रकार, व्यक्तीचे नाव बघायला मिळते.

तिथेच डाऊनलोड हा पर्याय निवडल्यानंतर संबंधित दस्ताऐवजी आणि कुणबी जातीच्या नोंद असलेल्या व्यक्तीचे नाव बघायला मिळते. ही नोंद प्रमाणित करण्यात आली असल्याने त्याची प्रत काढून सेतू सुविधा केंद्रात जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी करायच्या अर्जासोबत ती प्रत जोडावी.

प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे

१९६७ पूर्वीचा कुणबी नोंद असलेला एक पुरावा.

१०० रुपयांच्या बॉण्डवर वंशावळ प्रतिज्ञापत्र. सज्ञान असेल तर स्वत: अर्जदाराने तयार केलेली व नसेल तर अर्जदाराच्या वडिलाने केलेली वंशावळ.

अर्ज करणाऱ्याची टीसी, आधार कार्ड

वडील, काका, आजोबा शालेय पुरावे, ओळख पुरावे

या सर्व कागदपत्रांसाह आपले सरकार केंद्र, सेतू सुविधा केंद्राच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com