Crop Insurance Fraud : सव्वासात हजार शेतकऱ्यांनी भरला पीक नसतानाही पीकविमा

Crop Insurance Scheme : नुकसान झाल्यावर भरपाई मिळावी यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात कांदा लागवड केलेली नसतानाही ७ हजार २४१ शेतकऱ्यांनी पीक असल्याचे दाखवत पीकविमा भरला होता.
Crop Insurance Fraud
Crop Insurance FraudAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : नुकसान झाल्यावर भरपाई मिळावी यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात कांदा लागवड केलेली नसतानाही ७ हजार २४१ शेतकऱ्यांनी पीक असल्याचे दाखवत पीकविमा भरला होता. ते बनावट अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.

कृषी विभागाने केलेल्या तपासणीमुळे पीकविमा हप्त्यापोटी दिल्या जाणाऱ्या शासनाच्या एक कोटी २७ लाख रुपयांची बचत झाली आहे. जर एकट्या नगर जिल्ह्यात केवळ कांदा पिकांत सव्वासात हजार अर्ज बनावट असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अतिवृष्टी, सततचा पाऊस, दुष्काळ व अन्य नैसर्गिक कारणाने शेतपीकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवली जाते. यंदा खरीप हंगामात एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात ११ लाखांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. अंतिम आकडेवारीचा विचार करता अनेक पिकांत पेरणी अहवालापेक्षा अधिक क्षेत्रावर पीकविमा उतरवल्याचे दिसून आले.

Crop Insurance Fraud
Crop Insurance : परभणी, हिंगोलीत रब्बी पिकांचे ३ लाख १२ हजारांवर विमा प्रस्ताव

त्यात प्रामुख्याने हेक्टरी सर्वाधिक ८० हजाराची, तर सोयाबीनला ५७ हजार २६७ रुपयांची जोखीम आहे. त्यामुळे विमा मिळाला तर अधिक रक्कम मिळावी यासाठी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक वेगळे व विमा वेगळ्याच पिकांचा उतरवला असल्याचा कृषी विभागाला संशय आला होता.

त्यामुळे ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी संशय असलेल्या तालुक्यात तालुका कृषी कार्यालयाला आदेश देऊन ज्या पिकांचा विमा भरला त्याचे प्रत्यक्षात क्षेत्र आहे का याबाबत पडताळणी करण्याचे सांगितले होते. या पडताळणीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सात तालुक्यात ७ हजार २४१ शेतकऱ्यांनी २०५५.९८ हेक्टरवर कांदा लागवड नसतानाही कांदा पिकांचा पीकविमा भरल्याचे उघड झाले.

Crop Insurance Fraud
Crop Insurance Aid : अतिवृष्टीबाधित ८ लाख शेतकरी अर्थसाह्याच्या प्रतीक्षेत

त्यात संगमनेरला ३६ शेतकऱ्यांनी ९.७६ हेक्टर, श्रीरामपुरला १३२ शेतकऱ्यांनी ८१.०७ हेक्टर, राहुरीला ५६२ शेतकऱ्यांनी २१७.०७ हेक्टर, नेवाशाला १४०९ शेतकऱ्यांनी ६०१.४८ हेक्टर, श्रीगोंद्यात १३६१ शेतकऱ्यांनी २६८ .६८ हेक्टर, कोपरगावात २७६ शेतकऱ्यांनी १३०.५७ हेक्टरवर व पाथर्डी ३ हजार ४६५ शेतकऱ्यांनी ७४६.९३ हेक्टर क्षेत्रावर बनावट पीकविमा घेतल्याचे उघड झाले आहे.

हे सर्व बनावट अर्ज कृषी विभागाने रद्द केले आहेत. शेतकऱ्यांकडून फक्त १ रुपया घेऊन उर्वरित सर्व हप्ता सरकार भरत असल्याने सरकारकडून विमा हप्त्यापोटी जाणाऱ्या १ कोटी २७ लाखांची शासनाच्या रकमेची बचत झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल दिला आहे.

यंदाच्या खरीप पीकविमा योजनेत पेरणी अहवालापेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यामुळे बनावट अर्ज भरल्याची शंका आली होती. त्यात प्रामुख्याने कांदा पिकांत बनावट अर्ज असल्याच्या अंदाजाने पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात २०५५.९८ हेक्टरवर ७ हजार २४१ शेतकऱ्यांनी बनावट अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर दिला आहे.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com