
Parbhani News : यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात गुरुवारपर्यंत (ता. २८) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत १ लाख ७३ हजार ७३१ शेतकऱ्यांनी ३ लाख १२ हजार ५४९ पीकविमा प्रस्ताव दाखल केले आहेत.
या शेतकऱ्यांनी २ लाख ३४ हजार ८४० हेक्टरवरील पिकांसाठी ८५८ कोटी ९६ लाख ३५ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. रब्बी ज्वारी पिकाच्या विमा प्रस्तावासाठी शनिवारपर्यंत (ता. ३०) मुदत आहे. तर १५ डिसेंबरपर्यंत गहू व हरभरा या पिकांचे विमा प्रस्ताव दाखल करता येतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यातील गुरुवारपर्यंत (ता. २८) १ लाख ४६ हजार ४०६ शेतकऱ्यांनी २ लाख ६५ हजार ३८९ पीकविमा प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यांनी १ लाख ९६ हजार ५५० हेक्टरवरील पिकांसाठी ७१३ कोटी ७२ लाख ५० हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यात २७ हजार ३२५ शेतकऱ्यांनी ४७ हजार १६० विमा प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यांनी ३८ हजार २९० हेक्टरवरील पिकांसाठी १४५ कोटी २३ लाख ८५ हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. रब्बी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँक, PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in/ व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत पीकविमा अर्ज दाखल करता येतील.
शेतकऱ्यांना १ रुपया विमा हप्ता भरावा लागेल. विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, आधार नोंदणीची प्रत, ७-१२ उतारा, अधिसूचित पिकांचे पेरणी केलेले स्वयंघोषणा पत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, समंतिपत्र, बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँकांशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.