
Parbhani News : यंदाच्या (२०२४) सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांचे नुकसान झालेले परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ८ लाख २६ हजार ५४० बाधित शेतकरी शासकीय अर्थसाह्याच्या प्रतीक्षेत आहेत.
परभणी जिल्ह्यासाठी ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार निधी वितरणास मंजुरी देण्यात आली. परंतु हिंगोली जिल्ह्यासाठी आवश्यक ४१९ कोटी ४८ लाख २१ हजार ३०६ रुपये निधी मंजूर नाही. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अर्थसाह्याचे वितरण व निधी मंजुरी लांबणीवर पडले आहे.
यंदा १ ते १९ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे परभणी जिल्ह्यात ८३४ गावांतील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या ४ लाख २ हजार १२३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. त्यात जिरायती पिकांचे ४ लाख १ हजार ८८.५५ हेक्टर, बागायती पिकांचे ६७३ हेक्टर, फळपिकांचे ३६१.५० हेक्टर नुकसान झाले आहे.
जिरायती पिकांसाठी हेक्ट री १३ हजार ६०० रुपयांनुसार ५४५ कोटी ४८ लाख ४ हजार २१२ रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी २७ हजार रुपयांनुसार १ कोटी ८१ लाख ७१ हजार रुपये, फळपिकांसाठी हेक्टरी ३६ हजार रुपयांनुसार १ कोटी ३० लाख १४ हजार रुपये मिळून एकूण ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार २१२ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे तलाठी स्तरावर काम सुरू असले, तरी आचारसंहितेमुळे वितरण लांबणीवर पडल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यासाठी ४१९ कोटी
४८ लाख रुपयांवर निधी आवश्यक...
हिंगोली जिल्ह्यातील जिरायती, बागायती, फळपिके मिळून २ लाख ९५ हजार १७१.२५ हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले असून, २ लाख ९६ हजार ७७९ शेतकरी बाधित झाले आहेत.
शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४१९ कोटी ४८ लाख २१ हजार ३०६ रुपये निधी आवश्यक आहे, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. परंतु विधी वितरणास शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही.
परभणी जिल्हा अतिवृष्टी मदत मंजूर निधी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र निधी
परभणी १३० ९७८५२ ७५६९९ १०२ कोटी ९५ लाख रुपये
जिंतूर १६९ ८५२३१ ७९९७१ १०८ कोटी ८७ लाख रुपये
सेलू ९५ ५६०६१ ५२४९० ७१ कोटी ३८ लाख रुपये
मानवत ५३ ३८४९६ ३०९६४ ४२ कोटी ११ लाख रुपये
पाथरी ५६ ४७८०७ ४१५२१ ५८ कोटी ३ लाख रुपये
सोनपेठ ५२ ३२७८४ २५४९२ ३४ कोटी ६६ लाख रुपये
गंगाखेड १०५ ६२६७३ २९७५४ ४० कोटी ५० लाख रुपये
पालम ८० ४८५२७ ३०९४० ४२ कोटी ७ लाख रुपये
पूर्णा ९४ ६०३३० ३५२९२ ४७ कोटी ९९ लाख रुपये
हिंगोली जिल्हा अतिवृष्टी मदत आवश्यक निधी मागणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधी
हिंगोली ५२६५० ५८७६६ ८१ कोटी ४४ लाख रुपये
कळमनुरी ५९०१३ ६०६१९ ८५ कोटी ९२ लाख रुपये
वसमत ७५२६२ ६२१८९ ८९ कोटी ६५ लाख रुपये
औंढा नागनाथ ४९९२८ ४८६६० ६९कोटी १४ लाख रुपये
सेनगाव ५९९२९ ६४९३५ ९३ कोटी ३१ लाख रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.