Kharif Paisewari : जत तालुक्यातील ४६ गावांतील पैसेवारी पन्नास टक्क्यांहून अधिक

Kharif Season : सांगली जिल्ह्यातील खरीप बाजरी पिकाची हंगामी पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.
Kharif Crop
Kharif CropAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील खरीप बाजरी पिकाची हंगामी पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. यामध्ये जत तालुक्यातील खरीप हंगामामधील ५३ पैकी ४६ गावांची ग्राम पैसेवारी पन्नास टक्क्यांहून अधिक आली आहे.

केवळ सात गावांतील पैसेवारी ही पन्नास टक्क्यांहून कमी आलेली आहे. यंदा तालुक्यात पावसाने सरासरी गाठली असली, तरी पूर्व भागाला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे, तरी देखील ४६ गावांची पैसेवारी ५० ते ५५ टक्के इतकीच आहे. शिवाय, पंधरा दिवसांत या पैसेवारीसंदर्भात हरकत नोंदविता येणार आहे.

जत तालुक्यातील उत्पन्न सरासरी ५० टक्क्यांवर असले, तरी दुष्काळी परिस्थितीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. गत वर्षी सांगली जिल्ह्यातील सात तालुक्यांतील गावांमध्ये पन्नास टक्क्यांहून कमी पैसेवारी जाहीर झाली होती. यामध्ये जत तालुक्यातील सर्वच गावांत ग्राम पैसेवारी पन्नास टक्क्यांहून कमी आली होती.

Kharif Crop
Kharif Sowing : सोयाबीन क्षेत्रात दोन हजारने वाढ, तर तुरीत तीन हजार हेक्टरने घट

यंदा पावसाने पिकांना तुरळक पावसाने अल्पसा आधार दिला असला, तरी उत्पन्न मर्यादेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली नाही. दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तालुक्यात सत्तर गावांत रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे काही भागात रब्बी पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, रब्बी हंगामाच्या लागवडीनंतर जत तालुक्याला परतीच्या पावसाची प्रतीक्षा असते. या कालावधीत पाऊस चांगला पाऊस झाला, तर रब्बी पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहेत, अन्यथा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

Kharif Crop
Kharif Crop Damage : पावसाचा खरीप पिकांना दणका

पैसेवारी कशी काढली जाते..

पैसेवारी काढण्याची महसूल विभागाची पद्धत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मंडलातील एका गावाची निवड केली जाते. या गावातील एका शेतामध्ये १० बाय १० मीटर आकाराचे प्लॉट तयार केले जातात.

पन्नास टक्क्यांहून अधिक पैसेवारी असलेली गावे...

रामपूर, मल्लाळ, साळमळगेवाडी, येळदरी, खिलारवाडी, सिंदूर, बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, सिंगणहळ्ळी, मोकाशेवाडी, वायफळ, बनाळी, अंतराळ, खैराव, टोणेवाडी, येळवी, आवंढी, लोहगाव, तिप्पेहळ्ळी, बेवनूर, नवाळवाडी, धावडवाडी, गुळवंची, प्रतापूर, हिवरे, कोसारी, वाळेखिंडी, बिरनाळ, डफळापूर, खलाटी, वाषाण, एकुंडी, मिरवाड, जिरग्याळ, शेळकेवाडी, शिंगणापूर, अंकले, डोर्ली, बेळुंखी, बाज, कंठी, बागेवाडी, सनमडी, कोळगिरी, सालेगिरी.

पन्नास टक्क्यांहून कमी पैसेवारी असलेली गावे...

तिल्याळ, माडग्याळ, सोन्याळ, लकडेवाडी, जाडरबोबलाद,

भिवर्गी, करेवाडी, कोंतेबोबलाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com