Kharif Season : राज्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा बाजरीच्या क्षेत्रात काहीशी वाढ

Bajari Farming : राज्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या बाजरीच्या क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्या पावसामुळे पेरणी क्षेत्रात ६५ हजार हेक्टरने वाढ झाली आहे.
Bajari
Bajari Agrowon
Published on
Updated on

Nagar News : राज्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या बाजरीच्या क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्या पावसामुळे पेरणी क्षेत्रात ६५ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. तर गेल्या दहा वर्षांचा विचार केला असता राज्यात बाजरीचे क्षेत्र पाच ते सहा लाख हेक्टरने घटले आहे. राज्यात साधारणतः पंधरा वर्षांपूर्वी खरिपातील बाजरी हे प्रमुख पीक होते.

आता मात्र बाजरीचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याजागी कापूस, सोयाबीन व अन्य पिके घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात खरिपाचे १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर क्षेत्र असून, यंदा १ कोटी ३९ लाख ४६ हजार १८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा आतापर्यंत १ कोटी ३१ लाख ४४ हजार १६७ हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे.

Bajari
Bajari Rate : बाजरीला चांगली मागणी

राज्यात खरिपात प्रामुख्याने नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड हे जिल्हे प्रामुख्याने बाजरीचे उत्पादन घेणारे जिल्हे आहेत. बाजरीचे राज्यात यंदा सरासरी ६ लाख ६९ हजार ८९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत राज्यात ३ लाख ९४ हजार ३६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

अजून पेरणीची अंतिम आकडेवारी कृषी विभागाने जाहीर केलेली नसली तरी बाजरीचा पेरणी कालावधी उलटून पंधरा दिवस झाले आहेत. त्यामुळे पेरणी क्षेत्रात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. यंदा सरासरी क्षेत्राचा विचार केला तर एकाही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली नाही. तृणधान्यांचे क्षेत्र वाढावे यासाठी शासन मिलेट वर्ष साजरे करत असतानाही बाजरीचे क्षेत्र फारसे वाढले आहे.

Bajari
Bajari Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच; क्षेत्र स्थिर राहणार

यंदा मात्र पाऊस चांगला असल्याने लवकर पेरण्या झाल्याचा परिणाम म्हणून यंदा गत वर्षीपेक्षा ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाजरीचे वाढले आहे. दहा वर्षांचा विचार केला, तर सुमारे पाच ते सहा लाख हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. २०१०-११ मध्ये १० लाख ३५ हजार हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले होते. यंदा राज्यातील अकरा जिल्ह्यांत बाजरीची पेरणीच झाली नाही, तर नऊ जिल्ह्यांत अल्प पेरणी झालेली आहे.

दर नसल्याचा परिणाम

राज्यातील बहुतांश ग्रामीण भागात आहारात आता बाजरीचा समावेश वाढत आहे. शहरी भागातही बाजरीला मागणी आहे. तरीही बाजारात बाजरीला दर नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बाजरीचा ठोक दर अडीच-तीन हजारांच्या पुढे जायला तयार नाही. खर्चाच्या तुलनेत बाजरीचे पीक परवडत नाही, असे शेतकरी सांगतात. त्यामुळे राज्यातील बाजारात उत्तर भारतातील बाजरी अधिक प्रमाणात विकली जाते. महाराष्ट्रात मात्र मिलेट वर्ष साजरे होत असतानाही केवळ पुरेसा दर नसल्याने बाजरीचे क्षेत्र कमी होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

वर्षनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)
२०१८-१९ : ६,०९,६००
२०१९-२० : ६,७२,७८०
२०२०-२१ : ६,८७,५००
२०२१-२२ : ६,४४,७४०
२०२२-२३ : ४,९१,३००
२०२३-२४ : ३,२९,२२९
२०२४-२५ : ३,९४,३६८ (५ ऑगस्टपर्यंत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com