Agriculture Electricity : सुरळीत वीज पुरवठ्यासाठी कृषिपंपांना कपॅसिटर बसवा

Agriculture Pump : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू होण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्वीच बसवले आहेत.
Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity Connectionagrowon
Published on
Updated on

Akola News : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू होण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्वीच बसवले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते.

यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे. सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्वीचऐवजी कपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity : शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा द्या

प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

मात्र, बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली आहे. त्यामुळे ज्यांनी कपॅसिटर बसवले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत.

Agriculture Electricity Connection
Agriculture Electricity : शेती पंपाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर

कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. ते बसवल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात.

पुरेशा दाबाने वीज पुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांनी कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल.

ऑटोस्वीचचा वापर टाळावा

राज्यात ४५ लाखांहून अधिक कृषिपंपधारक शेतकरी आहेत. महावितरणकडून या शेतकऱ्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ‘ऑटोस्वीच’ लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाच वेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com