Product Packaging : वस्तूंच्या वेष्टनावर आता उत्पादन महिना, वर्ष बंधनकारक

Latest Agriculture News : आतापर्यंत उत्पादकांना आणि आयातदारांना वस्तूंच्या आवेष्टनांवर प्रत्यक्ष वस्तू उत्पादनाचा किंवा ती वस्तू अवेष्टित केल्याचा किंवा ती वस्तू आयात केल्याचा महिना आणि वर्ष छापण्याचे स्वातंत्र्य होते.
Agriculture Inputs
Agriculture InputsAgrowon

Nagpur News : अवेष्टित वस्तूंच्या उत्पादकांना आणि आयातदारांना वेष्टनावर उत्पादनाचा महिना आणि वर्ष घोषित करणे आता १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात आले आहे.

आतापर्यंत उत्पादकांना आणि आयातदारांना वस्तूंच्या आवेष्टनांवर प्रत्यक्ष वस्तू उत्पादनाचा किंवा ती वस्तू अवेष्टित केल्याचा किंवा ती वस्तू आयात केल्याचा महिना आणि वर्ष छापण्याचे स्वातंत्र्य होते.

परिणामी, बहुतांश प्रकरणांत वस्तू अवेष्टित केल्याचा किंवा आयात केल्याचा महिना आणि वर्ष आवेष्टनावर छापत असत. त्यामुळे ती वस्तू प्रत्यक्ष केव्हा उत्पादित केली आहे किंवा किती जूनी आहे, हे ग्राहकांना कळण्यास मार्ग नव्हता. यामुळे आता त्यावर आळा बसणार आहे.

१ जानेवारी २०२४ पासून केंद्र सरकारने उत्पादक आणि आयातदारांना वेष्टनावर प्रत्यक्ष उत्पादनाचा महिना आणि वर्ष घोषित करणे बंधनकारक केले आहे. तसेच विशिष्ट वजनातच वस्तू विकण्याचे बंधन हटविले आहे.

त्यामुळे आता ग्राहकांना वस्तू केव्हा उत्पादित केली आहे, किती नवी व जूनी आहे हे विकत घेताना कळू शकेल. ‌तसेच एमआरपी किंमतीशिवाय आवेष्टित वस्तूंवर प्रती युनिट किंमत छापणेसुद्धा १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक केले आहे. एखादी हजार ग्रॅम वजनाची वस्तू विकायची असल्यास त्याच्या एमआरपी किमतीबरोबरच त्याची प्रतिग्रॅम किंमत छापणेसुद्धा आता बंधनकारक केले आहे.

Agriculture Inputs
Pesticide Label Claim : विषबाधांच्या पार्श्‍वभूमीवर कीटकनाशक लेबलींगमध्ये हवी सुधारणा

अनेकदा, बऱ्याच वस्तू वेगवेगळ्या वजनांत बाजारात उपलब्ध असतात. यापूर्वी दूध, चहा, बिस्किटे, खाद्य तेले, पीठ, शीतपेये, पेयजल, बालान्न, डाळी, कडधान्ये, ब्रेड, डिटर्जंट, सिमेंट यांसारख्या १९ वस्तू विशिष्ट वजनातच म्हणजे ५०, ७५, १००, १५० ग्रॅम किंवा ठराविक किलो वा लिटरमध्येच विकणे बंधनकारक होते.

Agriculture Inputs
Pesticide Label Claim : संत्र्यामध्ये ‘लेबल क्‍लेम’ असलेल्या कीडनाशकांचा अभाव

त्यामुळे आतापर्यंत बाजारात वरीलप्रमाणे दोन-तीन ठराविक वजनाचेच ब्रेड, टूथपेस्ट, साबण, पेयजलाच्या बाटल्या बघायला मिळायच्या. आता १ जानेवारीपासून उत्पादकांवरील हे बंधन काढून टाकण्यात आले आहे आणि त्यामुळे आता हेच ब्रेड, टूथपेस्ट, साबण ५०, ६०, ७०, ७५, ८० ग्रॅम्स अशा कोणत्याही वजनात बाजारात येऊ शकतील.

ग्राहकांना गोंधळात टाकण्यासाठीच उत्पादकांनी ही मागणी केली असल्याचे बोलले जात असले तरी केंद्र सरकारने प्रतियुनिट किंमत छापण्याचे बंधन घालून, यात ग्राहकांचा गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com