
Crop Insurance Scheme Update पीकविमा योजनेत (Crop Insurance) अधिक पार्दशकता यावी यासाठी केंद्र सरकारने डिजिक्लेम (Gigi Claim Facility) ही डिजिटल सुविधा सुरू केली आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते कृषी भवनामध्ये या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.
यामुळे शेतकऱ्यांना जलद व पार्दशकपणे पीकविमा (Crop Insurance) मिळण्यास मदत होणार आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासह एकाच क्लिकवर विम्याची रक्कम मिळणार आहे.
तोमर यांनी गुरूवारी (ता. २३) पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टलचे (National Crop Insurance Portal-NCIP) डिजिक्लेम हे डिजीटल क्लेम सेटलमेंट मॉड्यूलचे लोकार्पण केले. यावेळी सहा राज्यातील योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना एक हजार २६० कोटी रुपयांचे वितरण या सुविधेच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी तोमर म्हणाले की, पीकविमा योजना ही सामान्य शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिलेले सर्वात मोठे सुरक्षाकवच आहे. ही योजना सुरू झाल्यापासून देशभरात ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्यांच्या माध्ययामातून एक लाख ३२ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला असून त्यांच्या नुकसानाची भरपाई झाली आहे.
डिजीक्लेमसह पीकविमा योजनेत एक नवीन मोड लाँच करण्यात आला आहे. ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या सोयीबरोबरच शेतकऱ्यांना पिकविम्याचे दावे मिळणार असून त्यामध्ये अधिक पारदर्शकता असणार आहे.
डिजिक्लेम या सुविधेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैशाचे वितरण केले जाणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात ही सुविधा राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड आणि हरियाणा या राज्यात सुरू केली जाणार आहे. त्यानंतर याचा विस्तार संपूर्ण देशभर करण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पीकविमा योजना ही कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास या योजनेतून शेतीपिकांना सुरक्षाकवच मिळते. मात्र, अनेकदा नुकसान भरपाईपोटी तुटपुंजी रक्कम परताव्याच्या स्वरुपात मिळत असल्याचा आरोप शेतकरी करतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.