Unseasonal Rain : मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

Avkali Rain : मराठवाड्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सूर्यदर्शन कमी व उकाडा जास्त अशी स्थिती आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील काही गावे शिवारात सोमवारी (ता.३१) दुपारनंतर व सायंकाळी अवकाळी पावसाची हजेरी लागली.
Unseasonal Rain
Unseasonal Rain Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सूर्यदर्शन कमी व उकाडा जास्त अशी स्थिती आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांतील काही गावे शिवारात सोमवारी (ता.३१) दुपारनंतर व सायंकाळी अवकाळी पावसाची हजेरी लागली.

माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बालानगरसह परिसरात सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास २० ते २५ मिनिटे पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणण्याचे काम केले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काही भागांत सोमवारी अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस साधारण एक तास झाल्याने कापणी व मळणी सुरू असलेली रब्बीतील पिके तसेच उन्हाळी बाजरीच्या पिकाला या अवकाळीचा फटका बसला आहे.

Unseasonal Rain
Pune Rain : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

निसर्गाच्या वर्षानुवर्षे बदलत्या चक्राने शेतकरी घायकुतीला येत आहे. खरिपाची पिके गेली तरी रब्बीतील पिकावर समाधानी असलेल्या शेतकऱ्यास अवकाळी गारपीट यास सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी देखील अतिवृष्टीने कापूस आणि सोयाबीन पिकाचे नुकसान तर झाले शिवाय दरही समाधान कारक मिळाला नाही. यामुळे रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, तसेच सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी कांदा, बाजरी, भुईमूग उन्हाळी पिके घेतली.

सद्यःस्थितीत गहू, हरभरा या पिकांची कापणी तर ज्वारी पिकाची मळणी सुरू असतानाच सोमवारी गेवराई तालुक्यातील रांजणी, गढी, निपाणी जवळका, वडगाव ढोक आदींसह विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. काढणी केलेले गहू, हरभरा, तसेच मळणी सुरू असलेल्या ज्वारीची कणसे भिजली. याशिवाय गावरान आंब्याला लगडलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणावर झडून पडल्या आहेत.

जालना जिल्ह्यातील केदारखेडा परिसरात सोमवारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांची गहू, शाळू, चारा, बाजरी पिकांचे नुकसान झाले. तसेच संध्याकाळी पाचच्या सुमारास आकाशात ढग दाटून येऊन वादळी वाऱ्याने पावसाला सुरुवात झाली. तसेच मध्यरात्रीही पावसाने पंधरा मिनिटे वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याची शाळू गहू ,बाजरी तसेच थोडे फार प्रमाणात आलेल्या आंब्याचा सडा पडला. सुमारे अर्धातास झालेल्या जोरदार पावसामुळे सोंगणीस आलेल्या बाजरी, गहू, शाळू, चारा

आदी पिकांचे नुकसान झाले. तसेच बंरजळा साबळे, नळणी आदी गावांतील शेतकऱ्यांची झाकण्यासाठी तारांबळ झाली. तरी वाऱ्याने झाकता आले नसल्याचे चाऱ्यासह वाळवणास घातलेल्या धान्य भिजले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com