Maharashtra Rain Alert: विदर्भात वादळी पाऊस, गारपीट! हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट'

Rain Prediction: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असताना विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमान ४१ अंशांवर पोहोचल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.
Weather Map
Weather MapAgrowon
Published on
Updated on

Pune News: कमाल तापमानाचा चाळिशीपार असल्याने उन्हाच्या झळा असह्य ठरत आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २१) विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैॡत्य मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणाली पासून तमिळनाडूपर्यंत खंडित वाऱ्यांमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरात केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली (एन्टी सायक्लोन) असल्याने पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्यांचा संगम होत आहे. या प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे देशातील उच्चांकी ४१.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर, जेऊर, ब्रह्मपुरी, अमरावती, वर्धा, आणि चंद्रपूर येथे तापमान ४० अंशांच्या वर आहे. धुळे, मालेगाव, परभणी, गडचिरोली, नागपूर, वाशीम आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

Weather Map
Maharashtra Weather Alert: विदर्भात वादळी पावसाचा इशारा! हवामान विभागाचा 'येलो अलर्ट'

राज्यात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २१) विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि नांदेड वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. जालना, परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरुवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३८.७---१७.५

अहिल्यानगर---३८.९---१८.५

धुळे---३९.०---१७.८

जळगाव---३७.८---२३.२

जेऊर---४०.०---१९.५

कोल्हापूर---३७.२---२२.२

महाबळेश्‍वर---३१.६---१९.०

मालेगाव---३९.८---२०.४

नाशिक---३६.३---१७.६

निफाड---३६.९---१४.१

सांगली---३८.५---२२.६

सातारा---३८.७---२१.१

सोलापूर---४०.८---२५.५

सांताक्रूझ---३२.४---२१.४

Weather Map
Unseasonal Rain: राज्यात बहुतांश भागांत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता

डहाणू---३२.८---२०.०

रत्नागिरी---३२.६---२१.८

छत्रपती संभाजीनगर---३८.०---२३.४

धाराशिव---निरंक---२३.०

परभणी---३९.९---२४.४

परभणी (कृषी)---३९.५---२१.२

अकोला---४१.१---२३.८

अमरावती---४०.२---२०.४

भंडारा---३८.०---२३.६

बुलडाणा---३८.२---२४.५

ब्रह्मपुरी---४०.३---२३.५

चंद्रपूर---४०.०---निरंक

गडचिरोली---३९.२---२०.६

गोंदिया---३७.०---२४.०

नागपूर---३९.२---२४.२

वर्धा---४०.२---२६.६

वाशीम---३९.८---निरंक

यवतमाळ---३९.५---२५.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२०.४---४१.१

मराठवाडा---२१.२---३९.९

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.५---४०.८

उत्तर महाराष्ट्र---१४.१---३९.८

कोकण---२०.०---३२.८

४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : अकोला ४१.१, सोलापूर ४०.८, ब्रह्मपुरी ४०.३, अमरावती ४०.२, वर्धा ४०.२, जेऊर ४०, चंद्रपूर ४०.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, नांदेड.

विजांसह पावसाची शक्यता : जालना, परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com