Monsoon Delay : कमी पावसाने शेतकऱ्यांवर काळजीचे ढग

Kharif Season : मॉन्सूनने जोरदार प्रवेश केल्यानंतर मोठा ब्रेक घेतला आहे. अजूनही मॉन्सूनचा मोठा पाऊस झालेला नाही. पावसाऐवजी तापमानात वाढ होत आहे.
Farmer In Crisis
Farmer In CrisisAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : मॉन्सूनने जोरदार प्रवेश केल्यानंतर मोठा ब्रेक घेतला आहे. अजूनही मॉन्सूनचा मोठा पाऊस झालेला नाही. पावसाऐवजी तापमानात वाढ होत आहे. १७ जूनपर्यंत ९२.९ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३७.५ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्यावर्षी याच तारखेला ५१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. यंदा तसा पाऊस झाला नसून, वातावरण तयार झालेले नसल्याने शेतकऱ्यांवर काळजीचे ढग दिसून येत आहेत. मॉन्सून दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतो. सात जूनपर्यंत तो राज्यात येतो. यंदा मॉन्सूनची सुरुवात चांगली झाली. पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यातच मॉन्सूनचे आगमन झाले.

मात्र, त्यानंतर पावसाने मोठी उसंत घेतली आहे. १७ जून उजाडला तरी मॉन्सूनच्या पावसाचा पत्ता नाही. दडी मारून बसलेला पाऊस मृगात बरसणार या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. शासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत ९२.९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ ३४.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

Farmer In Crisis
Kharif Sowing : जूनच्या मध्यावरही केवळ चार टक्केच पेरणी

मृगात पाऊस झाल्यानंतर शेतकरी पेरणीला सुरुवात करतो. यंदा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे आहेत. पाऊस येणे तर दूरच वातावरण पाहून पाऊस येईल, याचीही शाश्‍वती दिसत नाही. पावसाऐवजी तापमानात वाढ होत चालली आहे. गेल्या वर्षी ४७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

Farmer In Crisis
Kharif Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी

वार्षिक सरासरीच्या ५१ टक्के पाऊस १७ जूनपर्यंत झाला होता. यंदा अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पावसाच्या तुटीचे आकडे अधिक असल्याचे दिसत आहे.

पावसाच्या तुटीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. कोरडवाहू भागात अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे योग्य राहणार आहे. त्यामुळे पाऊस कधी पडतो, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

शेतकऱ्यांची स्थिती बिकट

मृगात पावसाची दमदार वाटचाल होते. या पावसाच्या बळावर शेतकरी पेरण्या पूर्ण करण्यास सुरुवात करतो. यंदा या नक्षत्राची सुरुवातच पावसाने झाली असली तरी अद्याप मनसोक्त बसरसलेला नाही. मृगात पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. पावसाची तूट भरून निघावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com